प्रत्येक वाहिनीवर कूकिंगचे कार्यक्रम प्रसारित होत असतात जे प्रेक्षकांचे, खासकरून गृहिणींचे, आवडते शोज आहेत. आता मनोरंजनाची चव वाढविण्यासाठी झी मराठीवर एक नवीन कूकिंग कार्यक्रम येतोय ज्याचे नाव आहे, ‘किचन कल्लाकार'. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे महाराष्ट्राचे लाडके कलाकार स्वयंपाकघरात अनेकविध डिशेस बनविताना दिसणार आहेत. संकर्षण कऱ्हाडे या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याचे आधीच कळले होते आणि आता अजून एक मोठी सेलेब्रिटी या शोसोबत जुळली आहे. प्रशांत दामले ‘किचन कल्लाकार' मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहेत.
खवय्ये म्हटल्यावर एक चेहरा हमखास डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अभिनेता प्रशांत दामले यांचा. प्रशांत दामले हे एक खवय्या सुद्धा आहेत आणि त्यांची हीच खवय्येगिरी आता प्रेक्षक पाहू शकतील झी मराठीवरील आगामी कार्यक्रम 'किचन कल्लाकार'मध्ये. झी मराठीवर 'किचन कल्लाकार' हा नवीन कूकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. त्यात संकर्षण म्हणताना दिसतोय की, आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तर असंच दिसत की पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचन मध्ये कस लागणार आहे. आता के कलाकार किचन मध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.
कुठले कलाकार पाककलेचे शिवधनुष्य पेलवू शकले याचा अंतिम निर्णय हा प्रशांत दामले घेणार आहेत. त्यामुळे कलाकारांना आता खवय्या प्रशांत दामले यांना आपल्या पाक-कौशल्याने प्रभावित करणं किती कठीण जाणार जाणार आहे हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.
हेही वाचा - बुतशिकन जावळी : अनोख्या नावाच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झाले प्रदर्शित!