ETV Bharat / sitara

प्रेक्षकांनी प्रत्येकवेळी 'बाहुबली' सारख्याच चित्रपटाची अपेक्षा करू नये - प्रभास

'साहो' चित्रपटाचेही बजेट मोठे आहे. त्यामुळेच प्रमोशनसाठीही भरपूर प्रमाणात पैसे खर्च करण्यात आले आहेत. अलिकडेच हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 'साहो'चा प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.

दरवेळी 'बाहुबली'सारखाच चित्रपट बनू शकत नाही - प्रभास
author img

By

Published : Aug 20, 2019, 2:32 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा 'बाहुबली' चित्रपटामुळे बॉलिवूडमध्येही लोकप्रिय झाला आहे. त्यामुळेच 'साहो' चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्येही पदार्पण करत आहे. 'साहो' हा एक अॅक्शनथ्रिलर असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. ३० ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट देखील 'बाहुबली' प्रमाणे हिट होईल का, यावर प्रभासने त्याचे मत व्यक्त केले आहे.

प्रभासच्या 'बाहुबली' चित्रपटाची विशेष क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, दरवेळी प्रेक्षकांनी 'बाहुबली' सारख्याच चित्रपटाची अपेक्षा ठेवू नये. 'बाहुबली' सारखा चित्रपट दरवेळी तयार होऊ शकत नाही. 'बाहुबली' चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर प्रभास दररोज २० पेक्षा जास्त मुलाखती देत असे. यावरुनच त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल. 'बाहुबलीने इतिहास घडवला, हे माझ्यासाठी चांगलेच आहे. सर्वकाही अगदी सुदररित्या त्यावेळी घडत गेले. मात्र, दरवेळी 'बाहुबली'सारखा चित्रपट कसा तयार होणार?, जर चित्रपटाची कथा चांगली असेल, तर त्याचा प्रभाव नक्कीच प्रेक्षकांवर पडतो. पण, प्रेक्षक नेहमी एकाचप्रकारच्या चित्रपटाची अपेक्षा नाही करू शकत', असे प्रभासने म्हटले आहे.

'साहो' चित्रपटाचेही बजेट मोठे आहे. त्यामुळेच प्रमोशनसाठीही भरपूर प्रमाणात पैसे खर्च करण्यात आले आहेत. अलिकडेच हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये 'साहो'चा प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारो चाहत्यांनी हजेरी लावली होती. या इव्हेंटवर तब्बल २.५० कोटींचा खर्च करण्यात आला असल्याचेही समोर आले आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हिंदीसह, तमिळ आणि तेलुगू भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता पाहता चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळेल, असा अंदाज समीक्षकांनी वर्तवला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.