ETV Bharat / sitara

पुन्हा 'लग्न' करण्याचा सल्ला मुलांनीच दिल्याचा पूजा बेदीने केला खुलासा!! - Pooja Bedi latest news

मॉडेल अभिनेत्री पूजा बेदीच्या आयुष्यात मानेकच्या रुपाने पुन्हा प्रेम परत आले आहे. दोघांची एंगमेंटही झाली आहे. याचे संपूर्ण श्रेय तिने आपल्या मुलांना दिले आहे.

Pooja Bedi
मॉडेल अभिनेत्री पूजा बेदी
author img

By

Published : May 14, 2020, 2:18 PM IST

मुंबई - पूजा बेदीच्या आयुष्यामध्ये पुन्हा प्रेम परतले आहे. याचे संपूर्ण श्रेय तिने मुलगी अलाया एफ आणि मुलगा ओमर यांना दिलंय. अलीकडेच एका मुलाखतीत याचा उल्लेख पूजाने केला होता. आयुष्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्याची आशा मुलांमुळे पल्लवीत झाल्याचे तिने म्हटले होते.

''माझ्या आयुष्यात आलेले पुरुष मुलांना आवडले आहेत आणि त्यातील प्रत्येकाला त्यांनी पसंत केलंय. पण काही कारणांनी ते घडू शकले नाही. परंतु मी माझा प्रवास त्यांच्यासोबत एन्जॉय केला होता'', असे पूजाने मुलाखतीत सांगितले होते.

पूजाच्या म्हणण्यानुसार, मुलांनी तिला सुचवले की आयुष्यात तिने कोणासोबत तरी स्थिर झाले पाहिजे. जसे तिचा अगोदरचा नवरा फरहान फर्निचरवाला याने लैला खानसोबत विवाह केला आणि त्यांना आता झान हा मुलगाही आहे.

''माझ्या आयुष्यात मानेक येण्यापूर्वी आलया आणि ओमर काही तरी चर्चा करीत होते आणि ते मला म्हणाले, 'मम्मा, तू तुझे आयुष्य जगले पाहिजेस'. मी म्हणलं, 'काय ?'... 'हो, पापाकडे पाहा, तो लैला आंटीला भेटला आणि तिच्यासोबत तो सेटल झाला.'', असे पूजा म्हणाली.

पूजाचा प्रियकर मानेक कॉन्ट्रॅक्टर हा तिच्या द लॉरेन्स स्कूल, सनावर ( शिमला, हिमाचल प्रदेशमधील एक खासगी बोर्डिंग स्कूल ) मधील सिनियर आहे. खूप वर्षानंतर दोघांची एका व्हट्सअ‌ॅप ग्रुपवर पुन्हा भेट झाली होती. एक वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्याने पूजाला रोमँटिक पध्दतीने प्रपोज केले होते. याला ती नकार देऊ शकली नव्हती.

पूजाने मानेकसोबत एंगेजमेंट झाल्याची बातमी ट्विटरवर दिली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.