मुंबई - 'दूरवर राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट' सांगणारा 'पाँडीचेरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
या चित्रपटात अभिनेता वैभव तत्ववादी, सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत आहेत. वैभव आणि सईचा लूक यापूर्वीच चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अमृताचीही खास झलक असलेले पोस्टर अलिकडेच रिलीज करण्यात आले होते.
'पाँडीचेरी' चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग पाँडिचेरी येथे करण्यात आले आहे. स्मार्टफोनवर या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सचिन कुंडलकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर चित्रीकरणादरम्यानचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.