ETV Bharat / sitara

‘पप्पी दे पारूला’ फेम रेश्मा सोनावणेचे नवीन आयटम सॉंग ‘जवानी २०’!

author img

By

Published : Apr 1, 2021, 6:38 PM IST

रेश्मा सोनावणे यांनी आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांतील सुपरहिट गाणी गायली आहेत. आता रेश्मा सोनावणे आणि हरिदास कड यांची गायिका-गीतकार जोडी अजून एक नवीन गाणे घेऊन आलीय. ‘जवानी २०’ हे नवं धमाकेदार गाणे आता रिलीज करण्यात आलंय.

रेश्मा सोनावणेचे नवीन आयटम सॉंग ‘जवानी २०’

गीतकार हरिदास कड यांनी ‘लय भारी पोरी’, पप्पी दे पारूला’ अशा गाण्यांचे बोल लिहिले आणि ती गाणी रेश्मा सोनावणेच्या पहाडी आवाजात ध्वनीमुद्रित झाली होती. या दोघांनी मिळून संगीत रसिकांना नेहमीच हिट गाणी दिली आहेत. आता रेश्मा सोनावणे आणि हरिदास कड यांची गायिका-गीतकार जोडी अजून एक नवीन गाणे घेऊन आलीय. ‘जवानी २०’ हे आधुनिक मराठी आयटम सॉंग म्हणता येईल आणि संदीप हिंदळेकर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

Reshma Sonawane's New Item Song 'Jawani 20'

रेश्मा सोनावणे यांनी आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांतील सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यात "पप्पी दे पारुला", "ही पोळी साजूक तुपातली", "वाट बघतोय रिक्षावाला" अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे. 'पप्पी दे पारूला' हे सुपरहिट गाणे देणाऱ्या गायिका रेश्मा सोनावणे आणि गीतकार हरिदास कड आता नवीन धमाकेदार गाणे घेऊन आले आहेत. 'मला न्हाय रं कुणाची गॅरंटी, माझी हाय रं जवानी २०' हे गाणे सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित होत आहे.सप्तसूर म्युझिक आणि फिल्मी आउल स्टुडिओज प्रस्तुत ‘जवानी २०....’ या गाण्याची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष यांनी केली आहे. नीलेश माळी, अनुजा चौधरी आणि प्रियांका जाधव या म्युझिक व्हिडिओमध्ये थिरकताना दिसणार आहेत. कृतिक माझिरे यांनी नृत्य दिग्दर्शन तर अनिकेत के. यांनी छायादिग्दर्शन केलं आहे.रेश्मा सोनावणे आणि हरिदास कड यांचं ‘जवानी २०’ हे नवं धमाकेदार गाणंही प्रेक्षक डोक्यावर नक्कीच घेतील असा विश्वास निर्माते बोलून दाखवीत आहेत.

हेही वाचा - खासदार किरण खेर यांना रक्ताचा कॅन्सर, अनुपम खेर यांनी दिला बातमीला दुजोरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.