ETV Bharat / sitara

‘ओव्हर द टॉप’ ठरणार भारताचा ओटीटी -स्वप्निल जोशी - Over the top

मराठी मनोरंजनसृष्टीचा अभिनेता स्वप्नील जोशी आणि उद्योगपती नरेंद्र फिरोदिया हे एकत्रितपणे ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) प्लॅटफॉर्म घेऊन येत आहेत. हे व्यासपीठ भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर दाखवणार आहे. लवकरच सुरु होत असलेले हे व्यासपीठ ‘भारताचे ओटीटी’ ठरणार असून त्यावर हिंदी, मराठी, बंगाली आदी प्रादेशिक भाषांमधील चित्रपट, वेब सिरीज, मालिका दाखविल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

अभिनेता स्वप्नील जोशी आणि उद्योगपती नरेंद्र फिरोदिया

author img

By

Published : Aug 7, 2021, 6:24 PM IST

मुंबई - काही वर्षांपूर्वी समोर आलेला ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या चांगली कामगिरी करत आहे. गेल्यावर्षी कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन लावण्यात आले होते. लोकांना घरातच बसून राहावे लागले होते. मनोरंजनासाठी लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा आधार घेतला होता. खरेतर कोरोना महामारी ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या पथ्यावरच पडली. या काळात त्यांची भरभराट झाली आणि त्यामुळेच नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म्स जन्माला येत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि उद्योगपती नरेंद्र फिरोदिया हे एकत्रितपणे ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) प्लॅटफॉर्म घेऊन येत आहेत. हे व्यासपीठ भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर दाखवणार आहे. लवकरच सुरु होत असलेले हे व्यासपीठ ‘भारताचे ओटीटी’ ठरणार असून त्यावर हिंदी, मराठी, बंगाली आदी प्रादेशिक भाषांमधील चित्रपट, वेब सिरीज, मालिका दाखविल्या जाणार आहेत.

‘टामोरा डीजीवर्ल्ड’

स्वप्निल जोशी त्यांच्या चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या आपल्या कंपनीच्या माध्यमातून एक ओटीटी व्यासपीठ दाखल करावे, हा विचार गेले सुमारे दीड वर्षे ते करत असून, त्यावर त्यांचे काम सुरु होते. त्याचवेळी फिरोदिया हेसुद्धा मराठी, गुजराती आणि इतर भाषांमधील कार्यक्रमासाठी ओटीटी प्लटफॉर्म असावा यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी तशी घोषणाही केली होती. आपापल्या क्षेत्रातील हे दोन दिग्गज आता एकत्र आले असून, त्यांनी हे व्यासपीठ अधिक मोठ्या प्रमाणावर दाखल करण्यासाठी भागीदारी केली आहे. त्याद्वारे आज प्रादेशिक कार्यक्रम ज्याप्रकारे ओटीटीवर सादर होतात. त्याच्यात अमुलाग्र स्थित्यंतर घडून येणार आहे.

स्वप्निल जोशी आणि नरेंद्र फिरोदिया एकत्र

केवळ भारतातील प्रादेशिक भाषाच नव्हे, पण अगदी परदेशी भाषांमधील कार्यक्रमसुद्धा पुढे जाऊन या व्यासपिठावर दाखल होणार आहेत. एक जागतिक स्तरावरील कंपनी सुरु होईल, या उद्दिष्टाने खूप चांगल्या लोकांचा चमू यासाठी एकत्र आला आहे. या उपक्रमाचे नाव काय असेल, त्याचा शुभारंभ कधी होईल, त्या सगळ्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. “एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळे करायला हवे, असे मनात सतत घोळत होते आणि त्यातून ओटीटी व्यासपीठ सुरु करावे असा विचार गेली दीड वर्षे मनात होता. याच प्रक्रियेत मग ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या कंपनीची स्थापना झाली. त्यासाठी काही समविचारी मित्र एकत्र आलो. आम्हाला लोकांना एक चांगले ओटीटी व्यासपीठ द्यायचे होते,” असे स्वप्नील म्हणाला.

‘लेट्सफ्लिक्स’ची घोषणा केल्यानंतर आणि त्याची सुरुवात करण्याची तयारी सुरु

‘एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्वप्निल आणि मी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर हे व्यासपीठ सुरु करायचे असे ठरवले. लॉकडाऊनमध्ये कित्येक ओटीटी प्लटफॉर्म सुरु झाले आणि विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांच्यावर दाखवले जात आहेत. ओटीटीवरील कॉन्टेटसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ असून, गेल्या काही वर्षांमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे.’ अस नरेंद्र फिरोदिया म्हणाले. ‘या व्यासपीठांवर प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रमांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नसल्याने, आम्ही ‘लेट्सफ्लिक्स’सुरु करायचे ठरवले आहे. भारतीय भाषांमधील चित्रपट, मालिका, कार्यक्रम त्यावर दाखावण्याचा विचार होता. पण ‘लेट्सफ्लिक्स’ची घोषणा केल्यानंतर आणि त्याची सुरुवात करण्याची तयारी सुरु असतना, तशाच प्रकारचा विचार स्वप्निल जोशी करत असल्याचे, मला समजले. मग आम्ही त्यावर चर्चा करुन एकमेकांबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा एकत्रित येऊन अधिक भव्य प्रमाणात ओटीटी व्यासपीठ सुरु करायचे. ठरवले असेही फिरोदिया म्हणाले आहेत.

प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम दाखवणार

या प्रकल्पाबद्दल मी नरेंद्र फिरोदिया यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांच्याबरोबर माझे गेल्या कित्येक वर्षांचे संबंध आहेत. त्यांची आणि माझी व्यवसाय महत्वाकांक्षा, तत्त्वे अशा सर्वच पातळ्यांवर वेव्हलेन्थ जुळते. ओटीटीबद्दल चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितले की, त्यांनीही ‘लेट्सफ्लिक्स’ या ओटीटीची योजना आखली असून, त्यावर ते प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम दाखवणार आहेत. आम्ही त्याबाबत चर्चा केली आणि त्यानंतर दोघांनीही एकत्र येण्याचे ठरवले. दोन्ही प्रकल्प एकत्र करून मोठ्या प्रमाणावर ओटीटी व्यासपीठ दाखल करायचे ठरले.’ असही स्वप्निल म्हणाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.