मुंबई - कॅन्सर अवेअरनेस दिवसाच्या निमित्ताने लोकांना हेल्थ चेकअप करण्याचा सल्ला सोनाली बेंद्रेने दिलाय. आपल्याला माहिती असेल की, सोनालीने कॅन्सशी झुंज दिली होती. सोनालीने ट्रीममेंटच्या काळातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. हेल्थ चेकअपचे नियोजन करुन आपला परिवार आणि मित्रांची रक्षा करण्याचे आवाहन तिने कलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनालीने लिहिलंय, ''नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डेच्या निमित्ताने तुम्ही एक गोष्ट आज करु शकता. हेल्थ चेकअपचे नियोजन करुन आपला परिवार आणि मित्रांची रक्षा करु शकता ही बाब निश्चित आहे.
जागृत रहा आणि तपासणी करा...खास करुन जेव्हा तुमच्या कुटुंबात कोणाला कॅन्सर असेल तर. माझ्यावर विश्वास ठेवा रुटीन चेकअप खूप आवश्यक आहे. तुम्ही काही वेगळं करु शकता...आजच तपासणी करा.''
सोनालीला कॅन्सर झाल्यानंतर तिच्या कुटुंबावर खूप मोठा आघात झाला होता. त्यानंतर तिने अमेरिकेत जाऊन पूर्ण उपचार घेतला. तिची कॅन्सरसोबतची लढाई यशस्वी झाली आहे.