ETV Bharat / sitara

नुशरत भरुचाच्या 'सइयां जी'ने ओलांडला ४० कोटी व्ह्यूजचा टप्पा - अभिनेत्री नुशरत भरूचा

रॅपर यो यो हनी सिंगचा नवा ट्रॅक 'सइयां जी' ने यूट्यूबवर ४० कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. अभिनेत्री नुशरत भरूचादेखील व्हिडिओमध्ये रॅपरबरोबर नाचताना दिसत आहे.

Nushrratt Bharuccha
नुशरत भरुचा
author img

By

Published : Jun 17, 2021, 9:01 PM IST

मुंबई - यो यो हनी सिंहचा नवा ट्रॅक 'सइयां जी' ने यूट्यूबवर ४० कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. अभिनेत्री नुशरत भरूचादेखील व्हिडिओमध्ये रॅपरबरोबर नाचताना दिसत आहे. याबद्दल बोलताना नुशरतम्हणाली, "''सइयां जी' ने ४० कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडणे खरोखर माझ्यासाठी एक विशेष क्षण आहे. हनी सिंह सर आणि मी आतापर्यंत काम केलेल्या सर्व गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे, परंतु यापूर्वी इतर गाण्यांनी ही उंची गाठली नव्हती. ही गोष्ट माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे.''

''सइयां जी' हे गाणे जानेवारीत रिलीज झाले आहे. नुशरत आणि हनी सिंहची अप्रतिम जोडी यापूर्वी 'छोटे छोटे पेग' आणि 'दिल चोरी' सारख्या गाण्यांमध्ये दिसली आहे.

गाण्याच्या संदर्भात नुसरत म्हणते, "हे गाणे चित्रपटाचा एक भाग नसून एक स्वतंत्र गाणे होते हे याचे वैशिष्ठय म्हणावे लागेल. यात कोणत्याही चित्रपटाच्या व्यक्तीरेखेबद्दलचे भाष्य नाही. याची आपली एक वेगळी शैली होती आणि एक कलाकार म्हणून अशा व्यक्तीरेखेच्या मूळापर्यंत जाणे एक रोमांचक गोष्ट होती. गाण्याचे संपूर्ण शूटिंग, त्याचे लोकेशन आणि टीमने माझा अनुभव आणखीन मजेदार बनविला आहे. मी याचे सर्व श्रेय हनी सिंह सरांच्या क्रिएटिव टीमला देऊ इच्छिते."

नुशरत येत्या काळात 'छोरी', 'हुडदंग', 'जनहित में जारी' आणि 'राम सेतू' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा - मर्सिडीस - मेबॅक GLS600 (किंमत ३ कोटी) : मुलगा इशांतला सोनू सूदची प्री-फादर्स डे भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.