मुंबई - सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फिल्म आणि टीव्ही जगतात दुःखाची लाट पाहायला मिळत आहे. सिध्दार्थ अतिशय उत्साही आणि मित्र जोडणारा व्यक्ती होता. त्यामुळे अनेक सेलेब्रिटीही निराश झाले आहेत. यामध्ये अभिनेत्री शहनाझ गील हिच्यावर सिध्दार्थच्या निधनाची बातमी समजताच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिने आपला फोन बंद ठेवला आहे.
हेही वाचा- अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज ओशिवरा स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
मीडिया रिपोर्टनुसार, शहनाजला जेव्हा सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा ती शुटिंग करीत होती. या बातमीने ती कोलमडली आणि तिने सेटवरुन बाहेर पडणे स्वीकारले. सिध्दार्थच्या निधनाने तू खूप दुःखी झाल्याचे तिच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले आहे. शहनाझचे वडील संतोख सिंग सुख यांनीही मुलीची तब्येत बरी नसल्याचे मीडियाला सांगितले.
हेही वाचा- वाचा.... सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूपूर्वीचा घटनाक्रम
सिध्दार्थ आणि शहनाझ यांची मैत्री सर्वश्रृत आहे. त्यांच्यात खूप चांगले बाँडिंग होते. 2019 मध्ये शहनाज आणि सिद्धार्थ या जोडीला रिअॅलिटी शो बिग बॉस 13मध्ये प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले. त्याकाळात 'सिडनाझ' हा ट्रेंड ट्विटरवर गाजला होता. ही जोडी तुटल्याची चर्चा मनोरंजन जगतात आहे.
हेही वाचा- सिध्दार्थ घरी परतला तेव्हा त्याच्या कारची काच फुटली होती..नेमक रात्री काय घडले?
सिध्दार्थ आणि शहनाझ यांनी अलिकडेच डान्स दिवाने या शोमध्ये आपली पुन्हा एकदा झलक दाखवली होती. त्या दोघांना स्टेजवर डान्स करताना पाहून चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या होत्या.
हेही वाचा- मृत्यूपूर्वी रात्री कुठे गेला होता सिध्दार्थ शुक्ला? त्याच्या कारला नेमके काय झाले होते?
बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये सिद्धार्थ आणि शहनाज यांच्यातील कुरबुरीही प्रेक्षकांनी पाहिल्या. पण ते एकमेकांची ज्या प्रकारे काळजी घेत होते ते प्रेक्षकांना जास्त आवडले.
हेही वाचा - पाहा विचित्र योगायोग...'बालिका वधू'मधील तिन्ही अभिनेत्यांचे झाले निधन