मुंबई - रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आठव्या दिवशीही सुरूच आहे. गेल्या आठ दिवसांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत आहे. रशियाची ही हट्टी आणि अमानवी वृत्ती पाहून अनेक देश विरोधात गेले आहेत. काही देशांनी रशियाला आर्थिक त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर काही देशांनी रशियाला होणारा तेल पुरवठाही बंद केला. याआधी गुगलने रशियातील अनेक चॅनल ब्लॉक केले होते. आता या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्स या OTT च्या जगाचील मोठ्या प्लॅटफॉर्मने एक मोठे पाऊल उचलले आहे.
नेटफ्लिक्सने म्हटले आहे की ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणतेही रशियन चॅनेल आणि सामग्री दाखवणार नाहीत. नेटफ्लिक्सने रशिया-युक्रेनचा विचार करून रशियन कायद्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “सध्याची परिस्थिती पाहता, या चॅनेलला आमच्या सेवेत जोडण्याची आमची कोणतीही योजना नाही.
नेटफ्लिक्सने युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर एका आठवड्यानंतर रशियन चॅनेल निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने सरकारी चॅनेल प्रसारित न करण्याच्या निर्णयाबद्दल रशियन अधिकार्यांना माहिती दिली की नाही हे सांगितले नाही. नेटफ्लिक्सचे रशियामध्ये कोणतेही कार्यालय नाही.
यापूर्वी, Netflix व्यतिरिक्त, Twitter, Facebook आणि YouTube ने देखील सर्व रशियन सरकारी मालकीच्या आउटलेटला युक्रेनवरील रशियन युद्धाविषयी खोट्या बातम्या पसरवण्यापासून रोखले होते.
हेही वाचा - करण जोहरने शनाया कपूरसह तीन स्टार किड्स केले लॉन्च