मुंबई - सध्या अनेक रियालिटी शोज प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. यात मनोरंजनसृष्टीतील गतकाळातील ज्येष्ठांना पाहुणे म्हणून बोलावून त्यांच्या कार्याला सन्मान तर करतातच परंतु त्यांच्या अनुभवाच्या बोलातून नवीन पिढीला शिकण्याची संधी मिळते. या कार्यक्रमांतून प्रेक्षकांना हास्यरंगाबरोबरच हृद्य क्षण सुद्धा अनुभवायला मिळतात. असेच काहीसे झाले संगीत रियालिटी शो इंडियन आयडॉल १२च्या सेटवर.
नेहा कक्करने केली संतोष आनंद यांची आर्थिक मदत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलने अनेक गायकांना घडविले आणि देशातील प्रसिद्ध गायक बनवले आहे. या सत्रातील स्पर्धक तर अत्यंत प्रतिभावान आहेत. गेल्या वीकएंडला लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रसिद्ध संगीतकार जोडीतील प्यारेलाल जी मंचावर उपस्थित होते. इंडियन आयडॉल टीमने याच कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांना देखील आमंत्रित केले होते. संतोष आनंद यांनी प्यारेलालजींसोबत काम केलेले आहे. संतोषजींनी त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्याचे सांगितले आणि सर्वांना धक्काच बसला. परंतु या शोची एक जज नेहा कक्कर हिने नुसता चूचकारा न काढता संतोषजींना आर्थिक मदत करण्याचे ठरविले आणि ताबडतोब ५ लाख रुपये त्यांच्याकडे सुपूर्द केले. तिच्या मते संतोषजी हे संगीत उद्योगातील एक महत्त्वाचे नाव आहे त्यामुळे त्यांना या प्रकारे मदत करण्याची तयारी तिने दर्शवली. त्यांची कहाणी ऐकून ती भावनावश झाली. नेहाने भारतीय मनोरंजन उद्योगाला देखील संतोषजींना काम देण्यासाठी आवाहन केले. फूल फुल ना फूलाची पाकळी म्हणून आपण त्यांना ५ लाख रु. देत आहोत असे ती म्हणाली. त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाबद्दल ऐकून नेहाला खूप वाईट वाटले आणि म्हणूनच संगीतक्षेत्रातील एका जेष्ठ कलाकाराला मदत करून समाधान मिळविले. नेहाने “एक प्यार का नगमा” गाणे गायले आणि संतोषजींनी देखील तिच्या सोबत काही ओळी गायल्या.इतकेच नाही, तर विशाल दादलानी यांनीही संतोषजींना त्यांची काही गाणी देण्याची विनंती केली. आणि ती लवकरात लवकर रिलीज करण्याची जबाबदारीही विशाल दादलानी यांनी उचलली आहे. इंडियन आयडॉल १२ च्या मंचावरील तिच्या या कृत्याबद्दल नेहाची सर्व स्तरावरून वाहवही होत आहे.
हेही वाचा - आयुष्मान, अनन्या, खूशी आणि इतर सेलेब्स विमानतळावर कॅमेऱ्यात झाले कैद