मुंबई - गायिका नेहा कक्कर आणि तिचा गायक पती रोहनप्रीत सिंग यांनी शुक्रवारी आपल्या पहिल्या मुलाच्या बातमीने सर्वांनाच चकित केले. खरेतर दोघांनीही सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यावरून नेहा गर्भवती असल्याचा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. नेहाने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. रोहनप्रीत नेहाला मागून मिठी मारताना दिसत आहे.
डेनिम डंगरी परिधान केलेल्या नेहाने या फोटोच्या शीर्षकात "काळजी घेत जा" असे लिहिले आहे.
त्याच वेळी रोहनप्रीतने या फोटोवर भाष्य केले की, “आता तुझी जास्त काळजी घ्यावी लागणार नेहु.”
हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत रोहनप्रीतने लिहिले आहे, "काळजी घेत जा नेहा कक्कर."
नेहा आणि रोहनप्रीत यांनी शीख विवाह परंपरा आनंद कारजनुसार या ऑक्टोबरमध्ये लग्न केले होते. तिने तिच्या लग्नाचे, तिच्या हळद आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
हेही वाचा -'अव्हेंजर्स' दिग्दर्शकांच्या पुढील चित्रपटात दिसणार साऊथ सुपरस्टार धनुष!
नेहा आणि रोहनप्रितच्या सध्याच्या फोटोवर कॉमेंट करताना जय भानुशालीने लिहिलंय, नेहान आणि रोहनला शुभेच्छा. तर संगीतकार रोचक कोहलीने लिहिलंय, ''मुबारकां''
नेहा आणि रोहनप्रितच्या या पोस्टमुळे चाहते मात्र गोंधळात पडले आहेत.
हेही वाचा -मी स्वतःला भाग्यवान समजते - सारा अली खान