डान्स रियालिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर ४' मध्ये या विकेंडला येणार आहेत गतकालीन सुप्रसिद्ध अभिनेत्री नीतू सिंग कपूर. नीतू कपूर यांनी बालवयातच सिनेमांत कामं करायला सुरुवात केली होती. खरंतर बॉलिवूडमध्ये जे बालकलाकार म्हणून प्रसिद्ध होते ते पुढे मोठेपणी तितकी प्रसिद्धी मिळवू शकले नाहीत. परंतु नीतू सिंग यांनी ती परंपरा खंडित केली आणि हिरॉईन म्हणूनसुद्धा भरपूर प्रसिद्धी मिळविली. अभिनेता ऋषी कपूरसोबत विवाह झाल्यावर नीतू कपूर यांनी अभिनय संन्यास घेतला होता.
या वीकएंडला 'सुपर डान्सर चॅप्टर ४' चे स्पर्धक नितू कपूरच्या गाजलेल्या गाण्यांवर परफॉर्म करतील आणि आपल्या डान्स स्टाइलमधून या ज्येष्ठ अभिनेत्रीला मानाचा मुजरा करतील. स्पर्धक परी आणि तिचा सुपर गुरु पंकज थापा यांनी ‘छू कर मेरे मन को’ या नितू कपूरच्या गाजलेल्या गाण्यावर परफॉर्म केले आणि आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांनाच थक्क करून सोडले. परीच्या त्या भावनाप्रधान परफॉर्मन्सने नितू कपूर अवाक झाल्या. इतके भावनाप्रधान गाणे या दोघांनी आपल्या परफॉर्मन्सने किती गोड केले हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले.
'सुपर डान्सर चॅप्टर ४' मधील पाच वर्षाची स्पर्धक परीचा परफॉर्मन्स बघितल्यावर त्या भूतकाळात गेल्या. परीचा ॲक्ट बघितल्यानंतर नितू कपूर यांनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी केलेल्या पहिल्या शूटिंगचा अनुभव सांगितला. इतक्या कोवळ्या वयात परीचे अप्रतिम नृत्य कौशल्य पाहून नितू कपूरने एक आठवण सांगितली जेव्हा त्या स्वतः पाच वर्षांच्या होत्या आणि ‘सूरज’ चित्रपटासाठी त्यांनी पहिला शॉट दिला होता. त्यांना डोंगरावर पळत जायचे होते परंतु रिटेक्स वर रिटेक्स झाले आणि सारखे वरखाली धावल्यामुळे त्यांचे कोवळे पाय सोळातून निघाले होते. त्या म्हणाल्या की हा शूटिंगचा पहिला अनुभव फारसा चांगला नव्हता.
रणबीरची चाहती असलेल्या परीने नितू कपूर यांना विचारले की, रणबीर अजूनही खट्याळ आहे का? यावर नितू कपूर उत्तरल्या, “रणबीर लहानपणी खूप खट्याळ होता आणि त्याला सगळ्या गोष्टींबद्दल उत्सुकता असायची. तो सतत काही ना काही खोड्या करत असायचा.” त्या पुढे म्हणाल्या की, “पण मला आनंद वाटतो की, आता तो खूप समंजस झाला आहे.” अनुराग बसूने रणबीरचा एक किस्सा सांगितला. बर्फीच्या सेट्सवर एकदा रणबीर कपूरला दुखापत झाली होती, तेव्हा त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या आसपास सगळेजण असूनही त्याने मात्र लगेच आपल्या आईला फोन लावला होता. त्यावेळी रणबीर च्या आपली आई नीतू कपूर बरोबरच्या खास ‘बॉण्ड’ बद्दल चर्चाही झाली होती. शिल्पा शेट्टी कुंद्राने त्या दोघांच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले, विशेषतः सुपर गुरु पंकजचे. तिने त्याला सांगितले की आजवरच्या त्याचा हा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स होता आणि तो पाहून ती खरोखर हेलावून गेली.
सुपर डान्सर चॅप्टर ४, हा डान्स रियालिटी शो दर वीक एंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.
हेही वाचा - HBD : सई ताम्हणकर आणि करिष्मा कपूर यांच्या प्रकट दिनानिमित्त.....