ETV Bharat / sitara

'बधाई हो' नंतर नीना गुप्ता-गजराज राव आयुष्मानसोबत पुन्हा झळकणार - gulabo sitabo

नीना गुप्ता-गजराज राव यांनी 'बधाई हो' चित्रपटात आयुष्मानच्या आईवडिलांची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा ते त्याच्यासोबत भूमिका साकारणार आहेत.

'बधाई हो' नंतर नीना गुप्ता-गजराज राव आयुष्मानसोबत पुन्हा झळकणार
author img

By

Published : Jul 13, 2019, 4:46 PM IST

मुंबई - आयुष्मान खुरानाचा सुपरहिट ठरलेल्या 'बधाई हो' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले होते. या चित्रपटात नीना गुप्ता आणि गजराज राव यांनी आयुष्मानच्या आईवडिलांची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेचेही प्रचंड कौतुक झाले होते. आता पुन्हा एकदा ते आयुष्मानसोबत झळकणार आहे. आयुष्मानचाच गाजलेला 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दोघेही पुन्हा त्याच्या आईवडिलांच्या भूमिकेत दिसतील.

आयुष्मान आणि भूमी पेडणेकर यांचा 'शुभ मंगल सावधान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेलही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आणखी कोण दिसणार याबद्दलची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता राजकुमार राव या चित्रपटात भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा आहेत.

दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की ''शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाची कथा खूप सुंदर आहे. ही कथा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल'. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

आयुष्मान महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही भूमिका साकारत आहे. आगामी 'गुलाबो सिताबो' चित्रपटात तो बिग बींसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटातील अमिताभ यांचा लूक समोर आला आहे. हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.