ETV Bharat / sitara

बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनी सोलापूरात नाट्यसंगीत सोहळा; अ.भा.नाट्य परिषदेचा उपक्रम - बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनी नाट्यसंगीत सोहळा

बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर आणि सिद्धा पाटील स्मृती समिती,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या बुधवारी म्हणजे दि.१५ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

Balgandharva's Memorial Day
बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनी सोलापूरात नाट्यसंगीत सोहळा
author img

By

Published : Jul 8, 2020, 8:15 PM IST

सोलापूर : बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर आणि सिद्धा पाटील स्मृती समिती,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या बुधवारी म्हणजे दि.१५ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहे. सोलापुरातील नामवंत कलावंत प्रशांत देशपांडे, संध्या जोशी,दीपक कलढोणे,नितीन दिवाकर या कलावंतांच्या नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम यु-ट्युब वरून सादर केला जाणार असून त्यानंतर सदर कार्यक्रमाची लिंक व्हॉट्सअपसह सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्म्सवरून पाठवली जाणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सोलापूर यांच्या कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये सर्वांनींच डिजिटल माध्यमांद्वारे नाट्यसंगीताच्या कार्यक्रम करण्याला होकार दिला. या बैठकीच्या सुरुवातीला कलाक्षेत्रातील जेष्ठ नामवंत कवी मधुकर जोशी, अपर्णा रामतीर्थकर, अशोक सुरतगावकर, कमल ढसाळ, सुनील कोळी, इरफान खान, ऋषी कपूर, अरुण वैद्य, रत्नाकर मतकरी, उत्तम चौगुले, रामचंद्र धुमाळ, कवी योगेश, वाजिद(संगीतकार), बासू चटर्जी, सुशांत राजपूत, कांचन नायक, लीलाधर कांबळी व सरोज खान आदी दिवंगत कलावंतांना परिषदेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.

हेही वाचा - ब्रॅड पिट झळकणार आगामी 'बुलेट ट्रेन' चित्रपटात

सध्या सोलापूरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्षात जरी कार्यक्रम करता येत नसला, तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण बालगंधर्वांना आदरांजली वाहणार आहोत. तरी सोलापुरातील आणि महाराष्ट्रातील रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी केलंय. या सभेस उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची, प्रमुख कार्यवाह जोतिबा काटे, सहकार्यवाह सुमित फुलमामडी, सुहास मार्डीकर हे उपस्थित होते. या बैठकीची तांत्रिक जबाबदारी निमंत्रित सदस्य सुभाष माने यांनी पाहिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.