मुंबई - सत्य घटनांवरील आधारित ‘देवमाणूस’ ही मालिका प्रेक्षकांनी उचलून धरली होती. त्यामुळेच त्याचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झाला आहे. सुरुवातीपासूनच पकड घेतलेल्या या मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठा वाढतच ठेवली आहे. मालिकेच्या या पर्वाने देखील प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. आता प्रेक्षकांना काळजी वाटतेय की देवीसिंग डिम्पलचा काटा काढणार का?
काय झाले आतापर्यंत ?
या मालिकेत देवीसिंग हा नटवर बनून गावात आला आहे. डिंपलला पूर्ण खात्री आहे की तो देवीसिंग आहे आणि त्यानेच सलोनीचा खून देखील केला आहे. त्यामुळे डिम्पल त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करतेय पण देवीसिंग तिच्या हाती काही लागू देत नाही. त्या दोघांच्या पुरावे गोळा करण्याच्या या झटापटीमध्ये देवीसिंग डिम्पलचा काटा काढायचं ठरवतो. मालिकेत पुढील आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल की देवीसिंग डिम्पलवर जीवघेणा हल्ला करणार आहे. तेव्हा डिम्पल या सगळ्यातून सुखरूप वाचेल कि डिम्पलचा प्रवास संपेल? हे प्रेक्षकांना पुढील भागात कळेलच.
हेही वाचा - Bollywood Corona Update : नफीसा अली, अरजित सिंग आणि मानवी गाग्रू कोरोना पॉझिटीव्ह