ETV Bharat / sitara

कंगना रणौतच्या 'लॉक अप'चा दुसरा स्पर्धक निश्चित, मुनव्वर फारुकी करणार प्रवेश - मुनव्वर फारुकी कंगना शोमध्ये

अभिनेत्री कंगना रणौत होस्ट करत असलेल्या लॉक अप या निर्भीड रिअॅलिटी शोमध्ये कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा दुसरा स्पर्धक असेल. निर्मात्यांनी मंगळवारी एका व्हिडिओद्वारे मुनवरच्या सहभागाची माहिती दिली.

मुनव्वर  फारुकी प्रवेश करणार लॉक अपमध्ये
मुनव्वर फारुकी प्रवेश करणार लॉक अपमध्ये
author img

By

Published : Feb 22, 2022, 3:18 PM IST

मुंबई - कॉमेडियन मुनव्वर फारुकी कंगना रणौतच्या आगामी रिअॅलिटी शो लॉक अपमध्ये सहभागी होणार आहे. शोच्या निर्मात्यांनी मंगळवारी एक व्हिडिओ अनावरण केला ज्यामध्ये मुनावरचा शोमध्ये सहभाग असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, " शोज हुये हैं इनके कॅन्सल, क्या चलेंगे लॉक अप में इनके प्लॅन्स? लॉक अप 27 फेब्रुवारीपासून मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग होत आहे.''

कॉमेडियन मुनव्वर फारुकीबद्दल सांगायचे तर 2021 मध्ये त्याला इंदूर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक केली होती आणि जवळपास एक महिना तो तुरुंगात होता.

शोमध्ये 16 वादग्रस्त सेलिब्रिटींना महिन्यांसाठी लॉक अपमध्ये ठेवले जाईल आणि त्यांच्या सुविधा काढून घेतल्या जातील. कंगना ऑल्ट बालाजी शो होस्ट करताना दिसणार आहे.

आधी कळवल्याप्रमाणे, निशा रावल ही निर्भय रिअॅलिटी शोची पहिली स्पर्धक म्हणून घोषित झाली आहे. मैं लक्ष्मी तेरे आंगन की, ये रिश्ता क्या कहलाता है यांसारख्या टीव्ही शोमधील भूमिकांसाठी निशा ओळखली जाते. ती करण मेहराची विभक्त पत्नी आहे. 2021 च्या मध्यात दोघे वेगळे झाले. निशा रावलने सांगितले की, करण मेहरा भावनिक आणि शारीरिकरित्या अत्याचार करत होता आणि तिने त्याच्यावर बेवफाईचा आरोपही केला होता. खरे तर निशा रावल हिने एफआयआर दाखल केला होता. त्यामुळे तिची एन्ट्री नक्कीच रंजक ठरेल.

हेही वाचा - सारा अली खानने शेअर केले जेहच्या पहिल्या बर्थडे पार्टीचे मनमोहक फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.