मुंबई : मराठी चित्रपट, मालिका व शोज मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सुस्वरूप अभिनेत्री मोनालिसा बागलने मराठमोळा साज चढवून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या वर्षाविषयी कोणालाच फारसं बोलावंसं वाटणार नाही, मात्र २०२० काही देऊन गेलं आणि काही घेऊन गेलं. काही जणांनी या वर्षाविषयी राग धरला तर काहींनी कृतज्ञता व्यक्त केली. असंच काहीसं घडलं अभिनेत्री मोनालिसा बागलच्या बाबतीत. २०२० मध्ये सिनेमा, मालिका, नाटक यांच्या घडामोडींना कुठेतरी ब्रेक लागला होता. बऱ्याचशा प्रकल्पांचे काम थांबले होते. मात्र, याच वर्षी मोनालिसा तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅक टू बॅक तिचे आगामी प्रोजेक्ट्स जाहीर करत होती.
![Monalisa Bagal flaunts her new look on the occasion of Makar Sankranti](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-monalisa-bagal-makar-sankrant-maharashtrian-look-mhc10001_14012021164347_1401f_1610622827_1046.jpeg)
“सच्चा लव्ह है, तो मुमकीन है… स्वागत तो करो हमारा” असं म्हणत 'भिरकीट'च्या टीझरमध्ये मोनालिसा ‘सैराट’ फेम तानाजी गालगुंडे सोबत झळकली. या टीझरने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली. इतकंच नव्हे तर मोनालिसाच्या सिनेमाच्या पुढच्या पोस्टरने तर अनेकांना करंट लागला. 'करंट' सिनेमाच्या पोस्टरच्या निमित्ताने मोनालिसाचा ग्लॅमरस अंदाज पाहून सर्वत्र तिचीच चर्चा रंगली. 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावरून पण मोनालिसा महाराष्ट्रातील जनतेचे मनोरंजन करतच होती.
![Monalisa Bagal flaunts her new look on the occasion of Makar Sankranti](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-monalisa-bagal-makar-sankrant-maharashtrian-look-mhc10001_14012021164347_1401f_1610622827_177.jpeg)
२०२१ दमदार करण्यासाठी मोनालिसा आता सज्ज झाली आहे. नुकतेच तिने The Elan Style ब्रँडसाठी कमाल फोटोशूट केले आहे आणि तिचे नवीन फोटोज् देखील अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. २०२१ मध्ये पण मोनालिसाचे सिनेमे येणार आहेत पण त्या विषयाची माहिती अजून गुलदस्त्यात आहे. आता तिने तिच्या सर्व चाहत्यांना व मराठी चित्रपट प्रेक्षकांना ‘तीळगुळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : 'केजीएफ २' मध्ये आलेल्या असंख्य 'विघ्नां'चा यशने केला पहिल्यांदाच खुलासा