ETV Bharat / sitara

'मिशन मंगल'ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई - गोल्ड

अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नु, क्रिती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, शर्मन जोशी अशी स्टारकास्ट असलेला 'मिशन मंगल' हा १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे.

'मिशन मंगल'ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग, पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई
author img

By

Published : Aug 16, 2019, 12:25 PM IST

मुंबई - स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' हा चित्रपट सिनेमागृहात झळकला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. चाहत्यांनी पहिल्या दिवशी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाच्या कमाईचे पहिल्या दिवशीचे आकडे देखील समोर आले आहेत.

अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नु, क्रिती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, शर्मन जोशी अशी स्टारकास्ट असलेला 'मिशन मंगल' हा १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची टक्कर जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस' सोबत झाली आहे. तरीही प्रेक्षकांचा 'मिशन मंगल' चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभला आहे.

पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई २९.१६ कोटी इतकी झाली आहे.

या चित्रपटात मंगळावर जाण्यासाठी मंगळयानाचा थरारक प्रवास दाखविण्यात आला आहे. प्रेक्षकांसोबत चित्रपट समीक्षकांनीही चित्रपटाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी चित्रपटातल्या प्रत्येक कलाकाराचे कौतुक करत या चित्रपटाला चार स्टार्स दिले आहेत.

  • #MissionMangal takes a fantabulous start... #IndependenceDay holiday gives biz an additional boost... Multiplexes outstanding, mass circuits good... Emerges Akshay Kumar's biggest opener... Thu ₹ 29.16 cr. India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) August 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अक्षयच्या 'या' चित्रपटांनी १५ ऑगस्ट रोजी केली दमदार कमाई -
२०१६: रुस्तम - १४.११ कोटी
२०१७: टॉयलेट एक प्रेमकथा - १३.१० कोटी
२०१८: गोल्ड - २५.२५ कोटी
२०१९: मिशन मंगल - २९.१६ कोटी

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.