फ्लोरिडा - मंगलोरमधील मॉडेल अॅडलिन कॅस्टेलिनो हिची निवड मिस युनिव्हर्सच्या 2020 स्पर्धेत भारताची प्रतिनिधित्व करण्यासाठी झाली होती. या स्पर्धेत तिला चौथे स्थान मिळाले आहे. ७४ स्पर्धक असलेल्या या स्पर्धेत कॅस्टेलिनोची कामगिरी उत्तम होती. विजेतीपदाचा मुकुट जरी तिला मिळाला नसला तरी उपस्थितांची मने तिने जिंकली आहेत.
अतिम फेरीच्या प्रश्न उत्तर राऊंडमध्ये कॅस्टेलिनो हिला कठीण प्रश्न विचारण्यात आला होता. याचे उत्तर तिने अंत्यत संवेदनशीपणे दिले. जजेसनी अॅडलिनला विचारले, "देशांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर ताण येत असतानाही कोविड -१९ मुळे लॉकडाउनचा निर्णय घ्यावा की त्यांनी आपल्या सीमारेषा मोकळ्या केल्या पाहिजेत आणि संसर्ग दरात वाढ होण्याचा धोका पत्करावा?"
-
What a powerful final answer from India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
LIVE on @FYI from @hardrockholly in #HollywoodFL pic.twitter.com/gmAjzt6n3T
">What a powerful final answer from India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021
LIVE on @FYI from @hardrockholly in #HollywoodFL pic.twitter.com/gmAjzt6n3TWhat a powerful final answer from India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021
LIVE on @FYI from @hardrockholly in #HollywoodFL pic.twitter.com/gmAjzt6n3T
त्यावर कॅस्टेलिनोने उत्तर दिले, "शुभ संध्याकाळ युनिव्हर्स. बरं, भारतातून येत आहे आणि सध्या भारत काय अनुभवत आहे याची साक्षीदार म्हणून, मला असं जाणवलं आहे की आपल्या प्रियजनांच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. आपल्याला अर्थव्यवस्था आणि आरोग्य यांच्यातील संतुलन सांभाळावे लागेल आणि हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा सरकार लोकांच्या हातात हात घालून काम करेल आणि असे काहीतरी निर्माण करेल जे अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरेल. धन्यवाद. "
नेटीझन्स मिस युनिव्हर्सच्या ट्विटर हँडलवर अॅडलिन कॅस्टेलिनोनेच्या शहाणपणाचे कौतुक करीत आहेत जिथे तिचा प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
-
FINAL STATEMENT: India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
LIVE on @FYI from @hardrockholly in #HollywoodFL pic.twitter.com/pHfYtxPJDZ
">FINAL STATEMENT: India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021
LIVE on @FYI from @hardrockholly in #HollywoodFL pic.twitter.com/pHfYtxPJDZFINAL STATEMENT: India. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021
LIVE on @FYI from @hardrockholly in #HollywoodFL pic.twitter.com/pHfYtxPJDZ
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे वर्षभर लांबलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने नवीन मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवला. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या मेझाने रात्री अखेरीस मिस ब्राझीलसह इतर ७३ सौंदर्यवतींना मागे टाकत हा मान मिळवला. स्पर्धेची विजेती घोषित करण्यापूर्वी सगळ्यांच्याच ह्रदयाचे ठोके वाढले होते. अखेर सूत्रसंचालकाने “व्हिवा मेक्सिको!” अशी घोषणा केली आणि जल्लोष झाला.
हेही वाचा - Cyclone Tauktae LIVE Updates : तौक्तेची तीव्रता वाढली; मुंबईत लोकल वाहतूक ठप्प, विमान सेवेवरही परिणाम..