ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष महेश केळुस्कर यांनी कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यासोबत हा राजीनामा पुन्हा मागे न घेण्यासाठी देत असल्याचंही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलंय.
गेल्या काही वर्षांत कोमसाप मध्ये आलेल्या काही तरुण पदाधिकाऱ्यांच्या वागणुकीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. मात्र त्यात कुणाचाही थेट उल्लेख केलेला नाही. गेल्याच वर्षी त्यांची पुढील 3 वर्षांसाठी या पदावर फेरनियुक्ती झालेली होती.
यासोबतच संस्थेकडून मिळालेला मानाचा कविता राजधानी पुरस्कार मेरीटवर मिळालेला असतानाही संस्थेच्या एका विश्वस्ताने त्याबाबत प्रशचिन्ह लावल्याने केळुस्कर यांनी जय कविता राजधानी म्हणत या पुरस्काराची रक्कम संस्थेच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करून टाकली आहे.
यावेळी संस्थेला पठवलेल्या राजीनामा पत्रात केळुस्कर आपली बाजू मांडली आहे -
२०१८ चा 'कविता राजधानी'पुरस्कार मेरिटवर स्वीकारताना मला आनंद झाला होता.पण त्यावरही संस्थेत अलिकडेच आलेल्या एका विश्वस्तांकडून प्रश्नचिन्ह लावण्यात आल्याने तो पुरस्कारही साभार परत करून प्राप्त रक्कम मी संस्थेच्या बँक अकाऊंटमधे जमा केलेली आहे.जय 'कविता राजधानी' !