फ्लोरिडा - मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाला २०२० साठी मिस युनिव्हर्सचा मुकुट देऊन गौरविण्यात आले आहे. या सौंदर्य ७४ स्पर्धकांना तिने मागे टाकले यात चौथ्या क्रमांकावर आलेल्या मिस इंडिया अॅडलिन कॅस्टेलिनोचाही समावेश होता. येथील हॉलीवूडमधील सेमिनोल हार्ड रॉक हॉटेल अँड कॅसिनो येथे रविवारी स्पर्धेच्या ६९ व्या पर्वाची सांगता झाली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साध्या वातावरणात पार पडला.
ब्राझीलची जुलिया गामा (२८) उपविजेती ठरली तर पेरूच्या जॅनिक मॅसेटा (२७) तिसर्या क्रमांकावर आहे. भारताची २२ वर्षिय मिस इंडिया अॅडलिन कॅस्टेलिनो हिने मिस युनिव्हर्सचे आपल्या अधिकृत ट्विटरवरुन अभिनंदन केले आहे.
-
WHO ARE YOU? #missuniverse pic.twitter.com/WFPhNz4zO6
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">WHO ARE YOU? #missuniverse pic.twitter.com/WFPhNz4zO6
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021WHO ARE YOU? #missuniverse pic.twitter.com/WFPhNz4zO6
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021
“मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताने तिसरे उपविजेतेपद मिळवले! मिस युनिव्हर्स पेजंटमध्ये असाधारण कामगिरी बजावणऱ्या आमच्या अॅडलिन कॅस्टेलिनो, आमच्या मिस दिवा युनिव्हर्स २०२० बद्दल आमची अंतःकरणे अफाट अभिमानाने भरलेली आहेत. तुझ्यापेक्षा तगडी प्रतिस्पर्धी मी पाहिली नाही.", असे तिने पोस्टमध्ये लिहिलंय.
तीन तास चाललेल्या मिस युनिव्हर्सच्या इव्हेन्टमध्ये "डेस्पासिटो" फेम गायक लुईस फोन्सीने आपला परफॉर्मन्स सादर केला. या स्पर्धेचे होस्ट म्हणून मारिओ लोपेझ आणि ऑलिव्हिया कुल्पो यांनी काम केले.
-
The new Miss Universe is Mexico!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/Mmb6l7tK8I
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The new Miss Universe is Mexico!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/Mmb6l7tK8I
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021The new Miss Universe is Mexico!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/Mmb6l7tK8I
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021
मेक्सिकोसाठी हा तिसरा मिस युनिव्हर्स विजय आहे, २०१० आणि १९९१ मध्ये अनुक्रमे झिमेना नावर्रेट आणि लुपिता जोन्स यांना विजेते घोषित करण्यात आले होते.
मिस युनिव्हर्स ही स्पर्धा एफवायआय चॅनेलवरुन १६० देशामध्ये प्रसारित झाली.
हेही वाचा - Cyclone Tauktae LIVE Updates : तौक्तेची तीव्रता वाढली; मुंबईत लोकल वाहतूक ठप्प, विमान सेवेवरही परिणाम..