मुंबई - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरचा आज ३९ वा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. मागच्या वर्षी त्याचा 'कबिर सिंग' हा चित्रपट बराच गाजला. वेगवेगळ्या कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत होता. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्याची पत्नी मीरानेही त्याच्यासाठी एक रोमॅन्टिक पोस्ट शेअर केली आहे.
शाहिदची पत्नी मीरा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच तिचे आणि शाहिदसोबतचे फोटो पोस्ट करत असते. त्यांच्या फोटोंना चाहत्यांच्या प्रतिक्रिया देखील मिळतात. शाहिदसोबतचा एक फोटो तिने इन्स्टास्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. 'माझ्या आयुष्यातील प्रेम', असे कॅप्शन देऊन तिने शाहिदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा -'कुली नंबर वन'च्या सेटवर सारा-वरुणचा रोमॅन्टिक अंदाज, शेअर केला फोटो
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सध्या तो त्याच्या आगामी 'जर्सी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंदीगढ येथे रवाना झालेला आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य 'जर्सी' चित्रपटाचाच हिंदी रिमेक आहे. मृणाल ठाकूर यामध्ये शाहिदसोबत भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात शाहिद क्रिकेटरच्या भूमिकेत झळकणार आहे.
हेही वाचा -'बॉलिवूड म्यूझिकल नाईट'मध्ये अलका याज्ञिकसह उदित नारायण यांच्या स्वरांचा नजराणा