‘माझ्या नवऱ्याची बायको’ या टीव्ही मालिकेतील शनाया या व्यक्तीरेखेमुळे मराठी घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनिल विवाहबंधनात अडकली आहे. रसिकाने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी विवाह गाठ बांधली आहे. अभिनेत्री रसिका आणि आदित्य बऱ्याच काळापासून डेट करीत होते व रिलेशनशिपमध्ये होते. रसिकाने त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. रसिका व आदित्यने गोव्यात लग्न केले आहे. सप्तपदीचा फोटो शेअर करत ‘१८ ऑक्टोबर २०२१, बीचवर रस्की वेड्स आदि’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. त्या दोघांनी १८ ऑक्टोबर रोजी लग्न केले होते. लग्नानंतर बारा दिवसांनी फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली आहे. अनेक चाहत्यांनी तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शनाया या व्यक्तीरेखेत रंग भरणारी अभिनेत्री रसिका सुनिल हिने 2 वर्षापूर्वी मालिका सोडली होती. त्यानंतर ती अमेरिकेला रवाना झाली होती. लॉस एंजेलिसमध्ये शिक्षणाच्या दरम्यान तिची आणि आदित्यची ओळख झाली आणि हे प्रेम पर्करण आता विवाहाच्या बोहल्यापर्यंत पोहोचलेले दिसते. आपण प्रेमात पडली असल्याचा खुलासा रसिकाने सोशल मीडियावर केला होता.
हेही वाचा - शाहरूखने आर्थर रोड तुरुंगातून आर्यनाला घरी आणण्याची जबाबदारी सोपवलेली तो 'रवी' कोण ? वाचा...