ETV Bharat / sitara

व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘माशुका’ नवे मराठी गाणे प्रदर्शित

author img

By

Published : Feb 14, 2021, 7:45 PM IST

सुप्रसिद्ध गायक प्रवीण कोळी यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून प्रवीण यांच्यासोबत आणि योगिता कोळी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. 'गोव्याच्या किनाऱ्यावर', 'इष्काची नौका', 'माझा बाप्पा' यासारख्या सुप्रसिद्ध आणि हिट झालेल्या गाण्यांना त्यांनी संगीत दिले आहे.

‘माशुका’ नवे मराठी गाणे चित्रित
‘माशुका’ नवे मराठी गाणे चित्रित

मुंबई- हल्लीच्या काळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मनोरंजनासाठी वेगवेगळी माध्यमं उपलब्ध झाली आहेत. यू-ट्यूब हे त्यातील एक. यू-ट्यूबवर सध्या जगातील कानाकोपऱ्यातील बातम्यांसह निरनिराळे मनोरंजनाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. कित्येक निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांनी स्वतःची यू-ट्यूब चॅनेल्स उघडली असून त्यातून फॅन्सशी जवळीक साधत असतात. असेच एक फेमस यू-ट्यूब चॅनेल ‘कोळीवूड प्रॉडक्शन’. या चॅनलचे १० लाखांच्यावर व्ह्यूज आहेत. हे चॅनेल आता एक रोमँटिक गाणे घेऊन आले आहे. या गाण्याचे नाव आहे ‘माशुका’. अभिनेत्री शरयू सोनावणे आणि अभिनेता रुपेश बने यांची खास जोडी पुन्हा एकदा 'माशुका' या रोमँटिक गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

‘माशुका’ नवे मराठी गाणे चित्रित
‘माशुका’ नवे मराठी गाणे चित्रित‘माशुका’ नवे मराठी गाणे चित्रित

सुप्रसिद्ध गायक प्रवीण कोळी यांचे दिग्दर्शन
व्हॅलेंटाईन डे हा प्रेमीयुगुलांसाठी जणू एक सणच. याच दिवसाचे औचित्य साधून 'माशुका' हे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. सुप्रसिद्ध गायक प्रवीण कोळी यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून प्रवीण यांच्यासोबत आणि योगिता कोळी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. 'गोव्याच्या किनाऱ्यावर', 'इष्काची नौका', 'माझा बाप्पा' यासारख्या सुप्रसिद्ध आणि हिट झालेल्या गाण्यांना त्यांनी संगीत दिले आहे. गायक पुष्पक परदेशी यांनी या गाण्याला सुमधुर स्वरात संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्यात असणारे रॅप गाणे गायक जे सुबोध आणि रे मार्शल यांनी गायले आहे.

‘माशुका’ नवे मराठी गाणे चित्रित
‘माशुका’ नवे मराठी गाणे चित्रित

'इमॅजिका पार्क'मध्ये गाणे चित्रित
'सूरसपाटा' चित्रपटात शरयू सोनावणे आणि रुपेश बने एकत्र झळकले होते. शरयू झी युवावरील 'प्रेम पॉयजन पंगा' या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली होती. तर रुपेश बने 'डान्स+५' या नामवंत रिअलिटी शोचा विजेता असून त्याने ‘सिंड्रेला', 'अतरंगी फंटर' या चित्रपटातून काम केले आहे. आता नव्याने ही जोडी एका रोमँटिक अशा 'माशुका' या प्रेमगीतामधून प्रेक्षकांसमोर आली आहे. या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे 'इमॅजिका पार्क'मध्ये चित्रित झाले असून 'इमॅजिका पार्क'मध्ये चित्रित होणारे पहिले मराठी गाणे आहे. व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत प्रदर्शित होणारे हे गाणे जरा हटके अंदाजात चित्रित झाले असून ते प्रेमवीरांना नक्कीच भुरळ घालेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.