ETV Bharat / sitara

मराठमोळ्या सेलिब्रिटींकडे कोरोनाचे नियम पाळून गणपती बाप्पाची स्थापना - Celebrity Ganesh festival

अनेक मराठी सेलिब्रिटींच्या घरी शनिवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पा घरात विराजमान झाले. आता आपली सारी काम बाजूला ठेवून पुढचे काही दिवस ही कलाकार मंडळी फक्त आणि फक्त गणपती बाप्पाच्या सेवेत दंग झालेली आपल्याला दिसणार आहेत.

Celebrity Ganpati
सेलिब्रिटी गणेशोत्सव
author img

By

Published : Aug 23, 2020, 1:06 AM IST

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एकत्र येऊन सण साजरा करण्याला बंधन आली असली तरीही गणेशोत्सवाचा उत्साह मात्र, तसूभरही कमी झालेला नाही. अनेक मराठी सेलिब्रिटींच्या घरी शनिवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पा घरात विराजमान झाले. आता आपली सारी काम बाजूला ठेवून पुढचे काही दिवस ही कलाकार मंडळी फक्त आणि फक्त गणपती बाप्पाच्या सेवेत दंग झालेली आपल्याला दिसणार आहेत.

मराठमोळ्या सेलिब्रिटीकडे कोरोनाचे नियम पाळून गणपतीबाप्पाची स्थापना
आदेश आणि सुचित्रा बांदेकर -

शिवसेनेचे नेते, सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आणि सगळ्या महिलांचे लाडके आदेश भाऊजी यांच्या पवईतील घरी गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. यावेळी घरातील नातेवाईक आणि आप्तस्वकीय यांच्या उपस्थितीत आदेश आणि सुचित्रा यांनी मनोभावे गणपती बाप्पाची आरती केली. कोरोनाचे विघ्न लवकर टळू देत, हीच प्रार्थना त्यांनी देवासमोर केली.

हृता दुर्गुळे

हृता ही दरवर्षी ठाण्यातील घोडबंदर रोडवर काकांच्या घरी गणपतीसाठी येते. संपूर्ण दिवसभर ती बाप्पाच्या सेवेत असते. यंदा काकांकडे जाण्यासाठी देखील तिला त्यांच्या सोसायटीला रीतसर पत्र लिहून परवानगी मिळवावी लागली होती. त्यामुळे दरवर्षी संपूर्ण कुटूंब एकत्र येऊन हा सण साजरा करत असले तरीही यंदा मात्र, बॅच तयार करून गणपतीचे दर्शन घ्यावे लागत आहे. असं असलं तरीही यंदा काळजी घ्या पुढच्या वर्षी नक्की छान कल्ला करू, असं तिनं आपल्या फॅन्सना सांगितलं आहे.

यशोमन आपटे

काहीशी अशीच परिस्थिती अभिनेता यशोमन आपटे यांच्याकडे देखील आहे. दरवर्षी गणपती निमित्त घरी येणारे पाहुणे यावेळी मात्र घरी येऊ शकले नाहीत. त्यामुळे बाप्पा घरी आल्याचा आनंद जरी असला तरीही सगळे सोबत नसल्याचं थोडं वाईट वाटत असल्याच त्याने कबूल केलं आहे. पण तरीही कोरोनाशी दोन हात करण्यासाठी हे सारं करणं गरजेचं आहे कारण हा आजार कुणालाही होऊ शकतो त्यामुळे काळजी घेणं एवढंच आपल्या हातात आहे असं त्याने सांगितलं.

शिव ठाकरे

मराठी बिग बॉसचा विजेता अभिनेता शिव ठाकरे यांच्या अमरावतीमधील घरी देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणपती बाप्पाचं आगमन झालं. आपल्या हातात उचलून बाप्पाचा जयघोष करत शिव लाडक्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन आला.

याशिवाय अभिनेता स्वप्नील जोशी, गायिका नेहा राजपाल, अभिनेत्री सुप्रिया पाठारे, अभिनेत्री सायली संजीव हिच्या नाशिकच्या घरी, अभिनेता सुबोध भावेच्या पुण्याच्या घरी मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. त्यामुळे कोरोनाने बंधन घातली असली तरीही बाप्पाशी असलेल्या स्ट्रॉंग बंधनामुळे हे सेलिब्रिटी बाप्पाची सेवा करण्यात यशस्वी ठरले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.