मुंबई - बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी आगामी ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटात एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. याच्या मेकअपसाठी त्याला रोज ४ तास वेळ लागत होता. 'सूरज पे मंगल भारी' या चित्रपटात दिलजित दोसंझ आणि फातिमा सना शेख आणि मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात मनोज बाजपेयी एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहेत.
हा एक मिश्किल विनोदी चित्रपट आहे. मनोज बाजपेयी गुप्तहेराची भूमिका करीत असल्यामुळे त्याला वेगवेगळे गेटअप करावे लागत होते. ट्रेलरमध्ये त्याचे वेगवेगळे अवतार आपल्याला पाहायला मिळाले आहेत.
'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट लग्नाच्या हेरगिरीचा विषय असलेल्या चित्रपट आहे. हा चित्रपट नवऱ्याची हेरगिरी करणार्या एका वेडिंग डिटेक्टिव्ह एजन्सीच्या कथेवर आधारित आहे.