ETV Bharat / sitara

युवा दिग्दर्शक मंदार कुलकर्णीच्या विचारांची प्रगल्भता ‘तुझं माझं जमतंय’ च्या दिग्दर्शनात उतरलीय!

निर्माते स्वप्निल मुनोत यांची निर्मिती असलेल्या 'तुझं माझं जमतंय' मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले आहेत. सोशल मीडियावर त्याची होणारी चर्चा यावरून हे स्पष्ट झालंय की या मालिकेने प्रेक्षकांना जिंकलय. या मालिकेचे दिग्दर्शन मंदार कुलकर्णी हा युवा दिग्दर्शक करतोय.

युवा दिग्दर्शक मंदार कुलकर्णी
author img

By

Published : Mar 25, 2021, 4:10 PM IST

असं म्हटलं जात की नाटक हे अभिनेत्यांचे माध्यम असते तर चित्रपट-मालिका दिग्दर्शकाचे. दिग्दर्शक नेहमीच 'कॅप्टन ऑफ दी शिप' असतो. उदाहरण द्यायचंच झालं तर झी युवा वाहिनीवरील 'तुझं माझं जमतंय' या मालिकेचं दिग्दर्शन करणारा तरुण दिग्दर्शक मंदार कुलकर्णीचे घ्या. तरुण वयातच विचारांची प्रगल्भता त्याच्या दिग्दर्शनातून उतरलेली दिसते. मालिका पडद्यावर उत्तम दिसण्यासाठी तो विशेष मेहनत घेत असतो. कलाकार आपापल्या परीने मेहनत घेतच असतात पण ज्याला आपण 'कॅप्टन ऑफ दी शिप' म्हणतो असा दिग्दर्शकाचा देखील महत्त्वाचा वाटा यात असतो. मालिका उत्तमप्रकारे दिग्दर्शकाने मांडली की मालिका सुपरहिट झालीच समजा.

Mandar Kulkarni
युवा दिग्दर्शक मंदार कुलकर्णी

हेही वाचा - कृती सेनॉनला वाटले प्रभास 'लाजाळू' आहे, पण..

ही मालिका हलकीफुलकी फॅमिली ड्रामा असलेली आहे. मूळात तरुणांना आवडेल अशी कथा आहे आणि ही कथा प्रत्येकाला आवडतेय कारण तरुण दिग्दर्शक मंदार कुलकर्णी या मालिकेचं दिग्दर्शन तरुणाईला भावेल याचा विचार करून करतोय. एक दिग्दर्शक म्हणून मंदार कुलकर्णीचं मालिकेविषयी मत अगदी स्पष्ट आहे त्याच्या मते, "मालिकेत सर्व गोष्टी असल्या पाहिजे, जसे की फॅमिली ड्रामा, ट्रॅजेडी, रोमान्स. मालिका जास्त न लांबवता शॉर्ट, सिम्पल आणि स्वीट असावी." उद्योजक, चित्रपट निर्माते नरेंद्र फिरोदिया यांना आदर्श मानणारे अहमदनगर फिल्म कंपनीचे निर्माते स्वप्निल मुनोत यांची निर्मिती असलेल्या 'तुझं माझं जमतंय' मालिकेचे पूर्ण झालेले १०० हून अधिक भाग झालेत. सोशल मीडियावर त्याची होणारी चर्चा यावरून हे स्पष्ट झालंय की या मालिकेने प्रेक्षकांना जिंकलय.

'तुझं माझं जमतंय' ही मालिका महाराष्ट्रातील प्रेक्षक विशेष करून तरुण वर्गाला आवडतेय व ते या मालिकेवर मनापासून प्रेम करताहेत. ही मालिका झी युवा वर प्रसारित होते.
हेही वाचा - आरआरआर’च्या ५ भाषांच्या थिएट्रिकल हक्कासाठी ३४८ कोटींची ‘विक्रमी’ ऑफर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.