ETV Bharat / sitara

Law of Love : प्रेमाचं वादळ येतंय ४ फेब्रुवारीला! - new marathi serial

प्रेमाचा अर्थ नव्याने उलगडून सांगण्याकरता चित्रपट निर्माते जे. उदय यांचा "लॉ ऑफ लव्ह" (Law of Love) हा सिनेमा व्हॅलेंटाईन महिन्यात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.

Law of Love
Law of Love
author img

By

Published : Jan 15, 2022, 12:26 PM IST

मुंबई - सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मनोरंजनसृष्टी थोडी थंडावली आहे. बहुतेक सर्वच हिंदी चित्रपटांची प्रदर्शनं लांबणीवर पडली आहेत. महाराष्ट्रात शासनाने चित्रपटगृहे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे नजीकच्या काळात बरेच मराठी चित्रपट प्रदर्शित होते आहेत. मुख्य म्हणजे मराठी चित्रपटांना नेहमीची हिंदी चित्रपटांबरोबर करावी लागणारी स्पर्धा नाहीये. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अजून एका मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली.

Law of Love
प्रेमाचं वादळ येतंय ४ फेब्रुवारीला!
प्रेमाचा अर्थ नव्याने उलगडून सांगण्याकरता चित्रपट निर्माते जे. उदय यांचा "लॉ ऑफ लव्ह" (Law of Love) हा सिनेमा व्हॅलेंटाईन महिन्यात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख त्यांच्या सोशल मीडियाद्वारे जाहीर करत चाहतेवर्गाला ही गोड बातमी दिली आहे. यानिमित्ताने चित्रपटाचे निर्माते तसेच अभिनेते जे. उदय म्हणाले की, "प्रेमाची नवी परिभाषा चित्रपटामार्फत सांगण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, आम्हाला खात्री आहे की या चित्रपटातुन आम्ही प्रेक्षकांची मने जिंकू."अभिनेता जे. उदय यांचा चित्रपट निर्मिती तसेच अभिनयाचा पहिलाच अनुभव असून त्यांच्या सोबत असलेली अभिनेत्री शालवी शाह देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याप्रमाणेच या सिनेमात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. वेदिका फिल्म क्रिएशन निर्मित "लॉ ऑफ लव्ह" येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा २१ फेब्रुवारी रोजी होणार विवाह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.