मुंबई - 'कुमकुम भाग्य' या टीव्ही मालिकेत इंदू दासीची लोकप्रिय भूमिका साकारणारी अभिनेत्री झरीना रोशन खान यांचे वयाच्या 54 व्या वर्षी हृदयविकाराच्या कारणामुळे निधन झाले. झरीना यांच्या अचानक निधनाने दु:खी झालेल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
झरीना यांचे सह कलाकार शब्बीर अहलुवालियाने त्यांचे काही एकत्र फोटो पोस्ट केले होते. त्यांनी याला कॅप्शन दिले होते, "ये चांद सा रोशन चेहरा...।"
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रीती झा यांनीही सोशल मीडियावर हे फोटो शेअर करून दुःख व्यक्त केले.
अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांनीही श्रीती झा यांची पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहिले, ''इश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो.''
'कुमकुम भाग्य' व्यतिरिक्त झरीना यांनी 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत गोपी दादी ही लोकप्रिय भूमिका साकारली होती.