मुंबई - अभिनेत्री कृती खरबंदाला पडद्यावर अॅक्शन सीन पाहायला खूप आवडते, त्यात तिला आनंद मिळतो आणि तिला महिला-केंद्रित अॅक्शन चित्रपटात काम करायला आवडेल, असंही तिने म्हटलं आहे.
कृतीने सांगितले की, "मला एक महिला अॅक्शन फिल्म करायला आवडेल. मला केवळ अॅक्शन सीक्वेन्स पाहणे आवडत नाही, तर मला त्यामध्ये सहभागी होण्यासही आवडेल. मला जिथंपर्यंत आठवतं तिथंपर्यंत मी नेहमीच मैदानी व्यक्ती आहे. मी बर्याच खेळांमध्येही सामील झाले आहे. मी टेनिस, बास्केटबॉल खेळते. शाळेत मी खो-खो देखील खेळला आहे. "
आता कृतीचा 'तैश' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा एक सूडनाट्य असलेला चित्रपट आहे. यात तिची अॅक्शन करण्याची इच्छा पूर्ण होईल.
या चित्रपटात पुलकित सम्राट, जिम सबर, हशवर्धन राणे, संजीदा शेख या कलाकारांचीही भूमिका आहे. तैश हा चित्रपट २९ ऑक्टोबरला झी 5 वर प्रदर्शित होईल.