ETV Bharat / sitara

केंडल जेन्नरचे अनोखे 'बॉटल कॅप चॅलेंज', व्हिडिओ व्हायरल - Kendle Jenner stunt in ocean

केंडल जेन्नरने समुद्रात स्टंट करीत बोटल कॅप चॅलेंज पार केले. हा व्हिडिओ सध्या ट्रेंडिगमध्ये असून काहीजण तिच्यावर टीकाही करीत आहेत.

केंडल जेन्नर
author img

By

Published : Jul 10, 2019, 10:28 AM IST

प्रसिध्द अमेरिकन मॉडेल आणि रियॅलिटी टीव्ही स्टार केंडल जेन्नर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. जगभर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती शेअर करीत असलेल्या फोटो आणि व्हिडिओला प्रचंड दाद मिळत असते. सध्या तिचा बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओ खूप चर्चेत आहे.

बोटल कॅप चलेंज सध्या ट्रेंडमध्ये आहे. केंडलने घेतलेले चॅलेंज सर्वाहून हटके आहे. ती समुद्रात स्पीड बोट चालवताना दिसते. ती बोटलच्या दिशेने वेगात येते आणि अखेरच्या क्षणी स्लोमोशनमध्ये बाटलीचे झाकन उडवते. हा व्हिडिओ सध्या जगभर पाहिला जातोय.

भारतातही बॉटल कॅप चॅलेंज सध्या सेलेब्रिटींच्यामध्ये आकर्षणाचा मुद्दा बनलाय. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने हे चॅलेंज स्वीकारत आपल्या मार्शल आर्टचा चमत्कार दाखवला होता. त्यानंतर टायगर श्रॉफने डोळे बांधून हे चॅलेंज पार पाडले होते. सोनू सूदपासून ते असंख्य कलाकारांनी हे चॅलेंज स्वीकारत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले आहेत. या पार्श्वभूमीवर केंडल जेन्नरचा हा व्हिडिओ सध्या गाजतोय, असे असले तरी तिच्यावर टीकाही होत आहे. समुद्रात होणारा प्लास्टीक कचरा हा पर्यावरणाचा मोठा मुद्दा आहे. अशावेळी असे चॅलेंज स्वीकारून केंडलने चूक केल्याचे युजर टीका करीत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.