ETV Bharat / sitara

'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय सोबत झळकणार 'ही' अभिनेत्री - sooryawanshi

तब्बल ९ वर्षानंतर अक्षय आणि कॅटरिनाची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सुरुवातीला या चित्रपटात जॅकलिन फर्नांडीस झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता यामध्ये कॅटरिना मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

'सूर्यवंशी' चित्रपटात झळकणार 'ही' अभिनेत्री
author img

By

Published : Mar 25, 2019, 7:17 PM IST

मुंबई - रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेल्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची दमदार झलक 'सिम्बा' चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अक्षय कुमार 'सूर्यवंशी'मध्ये झळकणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री झळकणार याबद्दलही प्रेक्षकांना उत्सुकता होती.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफची वर्णी लागली आहे. तब्बल ९ वर्षानंतर अक्षय आणि कॅटरिनाची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सुरुवातीला या चित्रपटात जॅकलिन फर्नांडीस झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता यामध्ये कॅटरिना मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

अक्षय कुमारनेच कॅटरिनाचे नाव सुचविल्याचे बोलले जात आहे. अक्षय आणि कॅटरिना यापूर्वी 'सिंग इज किंग', 'नमस्ते लंडन' आणि 'तिस मार खान' या चित्रपटात एकत्र झळकले होते. आता 'सूर्यवंशी' चित्रपटात पुन्हा एकदा ते एकत्र दिसणार आहेत.

अलिकडेच अक्षय कुमारचा 'केसरी' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. तीनच दिवसात या चित्रपटाने ५० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट १०० कोटीच्या घरात एन्ट्री करेल, असा अंदाज लावला जात आहे. अक्षय आगामी काळात 'हाऊसफुल-४', 'गुड न्यूज' आणि 'मिशन मंगल' चित्रपटातही झळकणार आहे. त्यामुळे २०१९ हे वर्ष अक्षयच्या चाहत्यासाठी आनंदाची पर्वणी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Intro:Body:

Katrina kaif, akshay kumar, rohit shetty, sooryawanshi, simmba

'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय सोबत झळकणार 'ही' अभिनेत्री

मुंबई - रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेल्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची दमदार झलक 'सिम्बा' चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अक्षय कुमार 'सूर्यवंशी'मध्ये झळकणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री झळकणार याबद्दलही प्रेक्षकांना उत्सुकता होती. 

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफची वर्णी लागली आहे. तब्बल ९ वर्षानंतर अक्षय आणि कॅटरिनाची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सुरुवातीला या चित्रपटात जॅकलिन फर्नांडीस झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता यामध्ये कॅटरिना मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

अक्षय कुमारनेच कॅटरिनाचे नाव सुचविल्याचे बोलले जात आहे. अक्षय आणि कॅटरिना यापूर्वी 'सिंग इज किंग', 'नमस्ते लंडन' आणि 'तिस मार खान' या चित्रपटात एकत्र झळकले होते. आता 'सूर्यवंशी' चित्रपटात पुन्हा एकदा ते एकत्र दिसणार आहेत.

अलिकडेच अक्षय कुमारचा 'केसरी' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. तीनच दिवसात या चित्रपटाने ५० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट १०० कोटीच्या घरात एन्ट्री करेल, असा अंदाज लावला जात आहे. अक्षय आगामी काळात 'हाऊसफुल-४', 'गुड न्यूज' आणि 'मिशन मंगल' चित्रपटातही झळकणार आहे. त्यामुळे २०१९ हे वर्ष अक्षयच्या चाहत्यासाठी आनंदाची पर्वणी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.