मुंबई - अभिनेत्री करिश्मा कपूरची मुलगी समायराने 'दौड' या शॉर्टफिल्ममध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री अनन्या पांडेची लहान बहिण रायसा पांडेने याचे दिग्दर्शन केले आहे.
साडे सात मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये संजय कपूरचा मुलगा जहानही झळकला आहे.
करिश्मा कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर या शॉर्ट फिल्मची लिंक शेअर केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'प्लीज लाईक, शेअर आणि सब्सक्राइब करा.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दौड ही शॉर्ट फिल्म आता यू-ट्यूबवर उपलब्ध आहे. मुंबईच्या झोपडपट्टीतील मुलीची ही कथा आहे.