मुंबई - व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिनेता अभिनेता करण कुंद्राने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. करण कुंद्राने त्याची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश उर्फ 'लड्डू' हिच्यावर आपले प्रेम इन्स्टाग्राम पोस्टवरुन व्यक्त केले. "जेव्हा मी माझे आशीर्वाद मोजतो, तेव्हा तुला दुप्पट मोजतो, लड्डू. माझ्या हृदयाला आजवरचा सर्वात आनंद देणार्या मुलीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा," असे त्याने लिहिलंय.
यावर तेजस्वीने प्रतिक्रिया देत लिहिले, "बेबी, तू ज्या प्रकारे प्रेम व्यक्त केलेस त्याबद्दल आय लव्ह यू माय व्हॅलेंटाईन.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तेजस्वी प्रकाशने बिग बॉस 15 ची ट्रॉफी जिंकल्यापासून ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. चाहत्यांनी तिच्या व करण कुंद्राच्या जोडीला 'तेजरन' असे नाव दिले होते. तेजस्वी आणि करण बिग बॉसच्या घरात भेटले. शोमध्ये दोघे प्रेमात पडले आणि त्यांची प्रेमकहाणी अजूनही सुरू आहे.
सध्या वर्क फ्रंटवर, तेजस्वी एकता कपूरच्या प्रसिद्ध टीव्ही मालिका 'नागिन 6' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात ती अभिनेता सिंबा नागपालसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
हेही वाचा - तेजस्वी प्रकाशने सांगितले 'नागिन' फ्रँचायझी हिट होण्याचे कारण