ETV Bharat / sitara

करण जोहरने आपल्या नैराश्य-समस्येबद्दल जाहीरपणे केले वक्तव्य! - बिग बॉस ओटीटीचा होस्ट करण जोहर

बिग बॉस ओटीटीमध्‍ये करण जोहरने स्‍वत:हून आयुष्यात अनुभवलेल्‍या नैराश्याबाबत वक्तव्य केले. त्याने, सामोरे गेलेल्या, चिंताग्रस्‍त वातावरणाबाबत जाहीरपणे वक्तव्य केले.

बिग बॉस ओटीटीमध्‍ये करण जोहर
बिग बॉस ओटीटीमध्‍ये करण जोहर
author img

By

Published : Aug 27, 2021, 7:28 PM IST

कोरोनामध्ये लॉकडाऊनचा सामना केल्यापासून मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. मनोरंजनसृष्टीत तर मानसिक आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. या इंडस्ट्रीत अपेक्षांचं ओझं वाहण्यात कमी पडणाऱ्या कलाकारांना नैराश्याचा सामना करावा लागतो हे अनेकांनी जाहीरपणे सांगितलं आहे. प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर देखील याला अपवाद नाही हे त्याने तो सूत्रसंचालन करीत असलेल्या ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये ‘संडे का वार’ मध्ये सांगितले.

बिग बॉस ओटीटीमध्‍ये करण जोहरने स्‍वत:हून आयुष्यात अनुभवलेल्‍या नैराश्याबाबत वक्तव्य केले. त्याने, सामोरे गेलेल्या, चिंताग्रस्‍त वातावरणाबाबत जाहीरपणे वक्तव्य केले. बिग बॉस ओटीटी होस्‍ट करणारा करण जोहर लोकांमध्ये आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूपच लोकप्रिय आहे. हा शो सुरू झाल्‍यापासून प्रेक्षकांनी त्‍याच्‍यावर प्रेमाचा भरपूर वर्षाव केला आहे. शोचे दोन ॲक्शन-पॅक्ड वीकेण्‍ड मधील त्याचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडतोय. शमिताबाबत व्‍यक्‍त केलेल्‍या मतासाठी दिव्‍याची मस्‍करी करण्‍यापासून झीशानला महिलांसोबत कशा पद्धतीने बोलावे हे दाखवून देण्‍यापर्यंत केजो (K Jo- करण जोहर चे ‘निक-नेम’) याने घरातील प्रत्‍येक सदस्‍याला ते काय बोलत आहेत आणि कोणासोबत बोलत आहेत याबाबत दक्ष केले आहे.

मागील 'संडे का वार'दरम्‍यान केजो झीशानवर नाराज झाले, कारण त्‍याने बिग बॉस घरामध्‍ये काही औषधे सेवन करण्‍यासंदर्भात शमिता शेट्टीशी उद्धटपणे संवाद केला होता. आपले स्‍टार होस्‍ट करण जोहर यांना घरामध्‍ये घडलेल्‍या घटनेबाबत समजल्‍यानंतर ते रागाने लालबुंद झाले. केजो यांनी शोमध्‍ये उलगडा केला की त्‍यांनी स्‍वत: देखील अशा स्थितीचा सामना केला आहे, जेथे ते नैराश्य, चिंताग्रस्‍तपणा व तणावाचा सामना करण्‍यासाठी ३ वर्षे ट्रीटमेंट घेत होते आणि औषध सेवन करत होते. झीशानला खडसावत करण म्हणाला की, “चिंता व मानसिक आरोग्‍य या समस्‍यांबाबत ज्‍या पद्धतीने बोलले जाते, ते ऐकून मला त्रास होतो. तुला माहित नसेल तर त्‍याबाबत बोलू नकोस’.''

सेलिब्रिटीला मानसिक आरोग्‍याबाबत व वैयक्तिक अनुभव सांगण्‍यासाठी खूप धाडस करावे लागते. करण जोहर ने नैराश्याबाबत कशाप्रकारे उपचार घेतला याबाबतच्‍या त्‍यांच्‍या अनुभवाबाबत जाहीरपणे सांगितले आणि त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

#BiggBossOTT प्रसारित होतो वूट व वूट सिलेक्‍टवर २४ तास!

हेही वाचा - सोनू सूदने घेतली अरविंद केजरीवालांची भेट, तर्क वितर्कांना वेग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.