कुल्लू - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा कोरोना टेस्ट रिपोर्ट आज सायंकाळपर्यंत येऊ शकतो. त्याचबरोबर अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे, की कंगना आपल्या वाहनातून रस्त्यामार्गे चंदीगडला जाऊ शकते आणि ती उद्या चंदीगडहून विमानाने मुंबईला रवाना होऊ शकेल.
मात्र, अद्याप कंगनाच्या निघण्याचे वेळापत्रक तयार नाही. काल तांत्रिक बिघाडामुळे भुंतर येथून आलेल्या विमानामध्ये तांत्रिक बिघाडामुळे ते परत जाऊ शकले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत कंगना रणौतच्या गाडीतून जाण्याची शक्यताही वाढली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंगनाच्या कोरोनाचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल दुपारनंतर मिळेल.
आरोग्य विभागाचे अधिकारी तो अहवाल कंगना रणौतला सादर करतील आणि त्यानंतरच ती निघण्याचा कार्यक्रम जाहीर करू शकेल. अलीकडेच कंगनाची बहीण आणि पीएच्या कोरोनाचे नमुनेही आरोग्य विभागाने घेतले होते. बीएमओ डॉ. रणजीत ठाकूर म्हणाले की, कोरोना चाचणीचा अहवाल आज दुपारी प्राप्त होईल.
काल वैद्यकीय पथकसुद्धा कंगनाच्या कोरोनाचा नमुना गोळा करण्यासाठी सिमसा येथील तिच्या घरी गेले होते. वैद्यकीय पथकात नग्गर आरोग्य विभागाचे बीएमओ डॉ. रणजीत सहभागी होते.