मुंबई - बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन आणि काजोल यांचा मुलगा युगचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त काजोल आणि अजयने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काजोल आणि अजयला न्यासा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे. दोघेही त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. काजोलने युगचा मजेशीर हावभाव असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये युग तिच्या कुशीत विसावलेला दिसतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अजयनेही युगसोबतचा फोटो शेअर केला आहे. 'तुला मोठं होताना पाहण्याचा आनंद हा खूप मोठा आहे', असं कॅप्शन त्याने या फोटोवर दिलं आहे.
काजोल आणि अजयने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा-आरोह वेलणकरनची पुरग्रस्तांना मदत, मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये दिले योगदान
वर्कफ्रन्टबाबत सांगायचं झालं, तर काजोलचा मागच्या वर्षी 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर, अजय देवगन हा 'तानाजी - द अनसंग वॉरिअर्स' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात काजोलची देखील भूमिका असल्याच्या चर्चा आहेत.