ETV Bharat / sitara

मे महिन्यात प्रदर्शित झाला ‘जून’ चित्रपटाचा ट्रेलर! - ‘जून’ चित्रपटाचा ट्रेलर!

एकसारख्या होणाऱ्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद ठेवली आहेत. छोट्या पडद्यावरील मालिका काही प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असल्या तरी बहुतांश प्रेक्षकवर्ग विविधांगी मनोरंजन देणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची कास धरताना दिसत आहेत.

जून चित्रपट
जून चित्रपट
author img

By

Published : May 19, 2021, 2:06 PM IST

मुंबई- एकसारख्या होणाऱ्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद ठेवली आहेत. छोट्या पडद्यावरील मालिका काही प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असल्या तरी बहुतांश प्रेक्षकवर्ग विविधांगी मनोरंजन देणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची कास धरताना दिसत आहेत. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मला महत्व प्राप्त झाले. परंतु मराठी चित्रपट आणि सीरिजसाठी कुठलाही प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हता.अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मराठी निर्मात्यांना आणि फिल्ममेकर्सना एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे.

अंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात निवड-
मागील काही महिन्यांपासून 'प्लॅनेट मराठी' ओटीटी आपल्या आगामी वेबसिरीज आणि वेबफिल्मची घोषणा करत आहे. त्यांचा पहिला 'जून' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ५१ व्या इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इंडिया) मधल्या इंडियन पॅनोरोमा या विभागात ‘जून’ चित्रपटाची निवड झाली होती. यासोबतच पुणे फ़िल्म फ़ेस्टिवल, केरळ फिल्म फेस्टिवल आणि आता न्यूय़ॉर्क फ़िल्म फेस्टिवलमध्ये जूनची निवड झाली आहे. यात सर्वोत्तम अभिनयाच्या पुरस्कार नामांकनामध्ये नेहा पेंडसे -बायस, सिद्धार्थ मेनन यांची निवड झाली आहे. सुप्री मीडियाचे शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे-बायस आणि ब्लू-ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू यांच्या संयुक्त विद्यमाने 'जून'ची निर्मिती करण्यात आली आहे.

नेहा पेंडसे- बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका-
'जून'च्या निमित्ताने निखिल महाजन निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. तसेच गायिका शाल्मली खोलगडे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच संगीतकाराची भूमिका बजावत आहे. नेहा पेंडसे- बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव ख्रिस्ती यांनी केले आहे. निखिल महाजन यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून 'जून' या चित्रपटाची गीते जितेंद्र जोशी यांनी लिहिली आहेत.

'जून' हा चित्रपट आम्ही ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर-
'‘जून’ चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण औरंगाबादमध्ये पार पडले आहे. माझा जन्मही औरंगाबादचा आणि हा ओटीटीचा पहिला चित्रपट त्यामुळे 'जून'चे मला विशेष कौतुक आहे. निखिल महाजन सारख्या तरुण दिग्दर्शकाचे लेखन, वैभव आणि सुहृद यांचे दिग्दर्शन असलेला 'जून' हा चित्रपट आम्ही ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत याचा आनंद आहे. मानवी स्वभावातील विविध कंगोरे 'जून' मधून उलगडले गेले आहेत. नील आणि नेहा यांच्या संवेदनशील नात्याची ही गोष्ट प्रेक्षकांनाही नक्की आवडेल''असा विश्वास प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- फक्त १५ मिनिटांत उरकले सोनाली कुलकर्णीचे लग्न!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.