मुंबई - सध्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश बंद आहे. घरी थांबूनच कोरोनाचा मुकाबला होऊ शकतो हे आता सगळे जण मान्य करुन आहेत. अशावेळी घरात बसून कंटाळा येऊ शकतो. असाच किस्सा घडला जॉनी लिव्हरच्या सोबत .
जॉनीने घराबाहे पडताना आई काय म्हणाली हे सांगणारा एक व्हिडिओ शेअर केलाय. घरी बसून कंटाळलेला जॉनी बाहेर पडत असताना त्याच्या आईने त्याला रोखले आणि कसे झापले याचा किस्सा त्याने सांगितलाय..
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अनेक सेलेब्स घरबसल्या लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून जॉनीने हा व्हिडिओ शेअर केलाय. आज सेल्फक्वारंटाईनमध्ये अनेक दिग्गज सेलेब्रिटी राहात आहेत. यात बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, कैटरीना कैफ, प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी यांचा समावेश आहे.