मुंबई - अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ ती पोस्ट करते. आपल्या अभिनयासोबतच जान्हवीला नृत्याचीही आवड आहे. अलिकडेच तिने 'पिया तोसे नैना लागे' या गाण्यावरचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या डान्सची नेटकरी प्रशंसा करत आहेत.
जान्हवीचा हा डान्स व्हिडिओ पाहून अनेकांनी तिच्यात श्रीदेवी यांची झलक पाहायला मिळते, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओत डान्सच्या शेवटी जान्हवीचा तोल जातो. मात्र, ती स्वत:ला सावरत डान्सचा शेवट करते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -कार्तिकने राजस्थानच्या थंडीवर अशी केली मात, व्हिडिओ व्हायरल
वक्रफ्रंटबाबत सांगायचं तर, जान्हवी लवकरच 'कारगिल गर्ल गुंजन सक्सेना' या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटातही तिची भूमिका आहे. यांशिवाय, राजकुमार रावसोबत 'रुही अफ्जा' आणि कार्तिक आर्यनसोबत 'दोस्ताना 2' या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.