मुंबई - सध्या बॉलिवूडबद्दल सुरू असलेले वाद हे केवळ लोकांची दिशाभूल करणारे आहेत. या वादात कोणीही गुंतू नये कारण हे व्यर्थ असल्याचे मत अभिनेता जयदीप अहलावत यांनी म्हटलंय.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हा उद्योग संशयाच्या धुक्यात हरवला आहे. बॉलिवूडमध्ये बाहेरुन आलेले लोकांना मिळणारी वागणूक आणि त्यातून उघडकीस आलेली ड्रग संस्कृती तसेच सोशल मीडियातून होणारे आरोप हे आपण पाहात आहोत.
इंडिया फिल्म प्रोजेक्टसाठी झालेल्या व्हर्चुअल पॅनल डिस्कशनमध्ये बोलताना अभिनेता जयदीप अहलावत म्हणाला की, बदनामीच्या या उद्योगात गुंतलेली बरीचशी सोशल मीडिया खाती ही खोटी आहेत.
"सोशल मीडियावर काय चालले आहे, हा फक्त धुर आहे, आकाश नाही. ते काय म्हणतात ते तत्वहीन आहे. न्यूज चॅनल्स म्हणतात हा नेपोटिझ्म आहे, हे ड्रगिस्ट आहेत आणि ते फक्त फॉलो करतात. यातील निम्याहून अधिक बनावट आहेत. आपण त्यांच्याशी झगडू शकत नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असेही तो म्हणाला.