मुंबई - जान कुमार सानू याने बिग बॉसच्या घरातून एक व्हिडिओ पोस्ट करीत मराठी जनतेची माफी मागितली आहे. त्याने काही दिवसापूर्वी बिग बॉसमध्ये स्पर्धक निक्की तांबोळीसोबत बोलताना, ''मराठीची चीड येते, मराठी बोलू नकोस हिंदी बोल,'' असे म्हटले होते. त्यानंतर शिवसेना आणि मनसे या पक्षांनी आक्रमक होऊन सानूला बिग बॉसमधून हाकला अशी मागणी केली होती.
-
🙏🏻#JKS #JaanKumarSanu #TeamJaan #BBLikeABoss #BB14OnVoot #BiggBoss2020 #BiggBossKiJaan #AbScenePaltega #BiggBoss14 #Colors #BiggBoss #BB14 pic.twitter.com/ldsolBYnZs
— Jaan Kumar Sanu (@jaankumarsanu) October 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🙏🏻#JKS #JaanKumarSanu #TeamJaan #BBLikeABoss #BB14OnVoot #BiggBoss2020 #BiggBossKiJaan #AbScenePaltega #BiggBoss14 #Colors #BiggBoss #BB14 pic.twitter.com/ldsolBYnZs
— Jaan Kumar Sanu (@jaankumarsanu) October 29, 2020🙏🏻#JKS #JaanKumarSanu #TeamJaan #BBLikeABoss #BB14OnVoot #BiggBoss2020 #BiggBossKiJaan #AbScenePaltega #BiggBoss14 #Colors #BiggBoss #BB14 pic.twitter.com/ldsolBYnZs
— Jaan Kumar Sanu (@jaankumarsanu) October 29, 2020
जान कुमार सानूने केलेल्या विधानामुळे मीडियात आणि सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मराठी भाषेचा अपमान झाल्याची भावना व्यक्त झाली. त्यानंतर कलर्स वाहिनीच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माफीनामा सादर करावा लागला. वायकॉम १८ या प्रॉडक्शन हाऊसनेही माफी मागितली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडेही पत्र पाठवून माफी मागण्यात आली होती.
दरम्यान, जान कुमार सानूची आई रिटा भट्टाचार्य यांनीही मुलगा चुकला असल्याचे सांगत माफी मागितली होती. आज कुमार सानूनेही मराठी जनतेची माफी मागितली आहे.