मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कुटुंबासह काही दिवसांपूर्वीच भारतास भेट दिली. त्यांच्या आग्रा भेटीचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांची मुलगी इवांका ट्रम्प हिनेही ताजमहाल समोर बसून फोटो काढले होते. मात्र, सोशल मीडियावर इवांकाच्या फोटोला फोटोशॉप करुन काही मिम्स तयार करणाऱ्यांनी स्वत:चे फोटो जोडले आहेत. सोशल मीडियावर हे फोटोशॉप झालेले फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये अभिनेता दलजीत दोसांझनेही इवांकासोबतचा फोटोशॉप केलेला फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर इवांकाने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दलजीत दोसांझने इवांकासोबत फोटो शेअर करुन त्यावर खास कॅप्शनही दिले होते. 'ताजमहाल पाहायचा म्हणून ती मागेच लागली होती. मग त्यामुळे तिला घेऊन गेलो होतो', असे कॅप्शन देऊन त्याने इवांकाच्या फोटोसोबत स्वत:चा फोटो जोडला होता. या फोटोबद्दल इवांकाने त्याचे आभार मानत, 'मला ताजमहाल दाखवल्याबद्दल धन्यवाद', अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचेही तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
-
Thank you for taking me to the spectacular Taj Mahal, @diljitdosanjh! 😉
— Ivanka Trump (@IvankaTrump) March 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
It was an experience I will never forget! https://t.co/VgqFuYBRIg
">Thank you for taking me to the spectacular Taj Mahal, @diljitdosanjh! 😉
— Ivanka Trump (@IvankaTrump) March 1, 2020
It was an experience I will never forget! https://t.co/VgqFuYBRIgThank you for taking me to the spectacular Taj Mahal, @diljitdosanjh! 😉
— Ivanka Trump (@IvankaTrump) March 1, 2020
It was an experience I will never forget! https://t.co/VgqFuYBRIg
-
I appreciate the warmth of the Indian people.
— Ivanka Trump (@IvankaTrump) March 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
...I made many new friends!!! https://t.co/MXz5PkapBg
">I appreciate the warmth of the Indian people.
— Ivanka Trump (@IvankaTrump) March 1, 2020
...I made many new friends!!! https://t.co/MXz5PkapBgI appreciate the warmth of the Indian people.
— Ivanka Trump (@IvankaTrump) March 1, 2020
...I made many new friends!!! https://t.co/MXz5PkapBg
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इवांकाने इतर मीम्स तयार करणाऱ्यांचे कौतुक करणारेही ट्विट केले होते. 'मला भारतात बरेच मित्र मिळाले. मी खूप भारावले आहे', असे तिने या ट्विटमध्ये लिहले होते.