ETV Bharat / sitara

सुशांतच्या मृत्यूचा प्रसिध्दीसाठी वापर करणे अनैतिक : निशांत मलकानी - निशांत मलकानी

आतापर्यंत अनेक लोक सुशातच्या मृत्यूचा प्रचारात येण्याचे माध्यम म्हणून या प्रकरणाकडे पाहात आहेत. याबद्दल टेलिव्हिजन स्टार निशांत मलकानी यांनी आक्षेप घेतला आहे.

Nishant Malkani
निशांत मलकानी
author img

By

Published : Sep 4, 2020, 7:30 PM IST

मुंबई - टेलिव्हिजन स्टार निशांत मलकानी यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत कलाकार म्हणून छोट्या पडद्यावर जवळून काम केले आहे. सुशांतच्या मृत्यूवर भाष्य करण्यापासून तो स्वत: ला दूर ठेवत असल्याचे निशांत म्हणतो. कारण आतापर्यंत अनेक लोक प्रचारात येण्याचे माध्यम म्हणून या प्रकरणाकडे पाहात आहेत.

निशांत म्हणाला, "सुरुवातीला मला त्यावर भाष्य करायला आवडले नाही कारण प्रसिध्दी मिळवण्यासाठी सुरुवातीला लोक मृत्यूबद्दल आपले मत देत होते आणि मला ते योग्य वाटत नाही. एखाद्याच्या मृत्यूला प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग बनविणे हे माझ्या कल्पनेप्रमाणे नैतिकतेच्या विरोधात आहे, परंतु आता प्रारंभिक टप्पा पार झाला आहे, आता जे खरोखरच सत्य आहेत तेच सुशांतबद्दल आपले मत मांडू शकतात. "

'प्रीत से बांधी ये दोरी राम मिलाए जोडी' मध्ये निशांत अनुकल्प गांधीच्या मुख्य भूमिकेत होता, तर सुशांत देखील ' 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मानव देशमुखची भूमिका साकारत होता. हे दोन्ही कार्यक्रम एकाच वाहिनीवर प्रसारित झाले होते.

निशांत म्हणतो, "एकाच उद्योगात एकत्र काम करत होतो ही गोष्ट सोडून द्या, एक माणूस म्हणून मला असं वाटतं की जर एखाद्याने स्वत: चा जीव घेतला असेल तर दोषींना उघडकीस आणून शिक्षा देणे आवश्यक आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.