ETV Bharat / sitara

लग्नानंतर घ्याव्या लागणाऱ्या अनपेक्षित वळणाची गोष्ट 'यू टर्न'

नवरा बायकोच्या नात्याभोवती या वेब सीरिजची कथा फिरते. हे नातं जितकं गोड तितकंच ते टिकवणं कठीण आहे. एकमेकांना सांभाळत पुढे जाताना वारंवार भांड्याला भांड लागतंच आणि मग सुरू होते त्या नात्यापासून यू टर्न घेण्याची धडपड.

सायली संजीव-ओमप्रकाश शिंदे
author img

By

Published : Aug 8, 2019, 8:40 PM IST

मुंबई - मराठी वेब सीरिजच्या विश्वात सध्या अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगांना तरुणाईचा चांगला प्रतिसादही मिळताना दिसतो. अशात आता मुव्हिंग आऊट या वेबसिरीजच्या यशानंतर दिग्दर्शक मयुरेश जोशी एक नवी कोरी वेब सीरिज आपल्या भेटीला घेऊन आले आहेत, जिचं नाव आहे 'यू टर्न'.

झळकणार हे कलाकार -

'काहे दिया परदेस' या मालिकेतील गौरीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव आणि 'लक्ष्मी सदैव मंगलम', 'खुलता कळी खुलेना' या मालिकेंमुळे लोकप्रिय झालेला चेहरा ओमप्रकाश शिंदे हे दोघे 'यू टर्न' या वेबसीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

अशी असणार कथा -

नवरा बायकोच्या नात्याभोवती या वेब सीरिजची कथा फिरते. हे नातं जितकं गोड तितकंच ते टिकवणं कठीण आहे. एकमेकांना सांभाळत पुढे जाताना वारंवार भांड्याला भांड लागतंच आणि मग सुरू होते त्या नात्यापासून यू टर्न घेण्याची धडपड. यातून पुढे नेमकं काय घडत जात हे या वेब सीरिजद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजमध्ये एक मोठी सुंदर गजल ऐकायला मिळणार असून ती स्वतः या सीरिजचे दिग्दर्शक मयुरेश जोशी यांनीच संगीतबद्ध करून गायलीही आहे. वेबसिरीजच्या सहा एपिसोडद्वारे आपल्याला ती ऐकायला मिळेल.

'राजश्री मराठी'च्या 'यू ट्यूब चॅनल'वर ही सीरिज सुरू झाली असून प्रत्येक मंगळवारी एक यानुसार तिचे 2 एपिसोड रिलीज झालेत. आता हे एपिसोड प्रेक्षकांना किती आवडतात ते लवकरच कळेल पण सायली आणि ओमप्रकाश यांना एकमेकांसोबत काम करून कस वाटलं, ते त्यांच्याकडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी..

Intro:मराठी वेब सिरीजच्या विश्वात सध्या अनेक वेगवेगळे प्रयोग केले जातायत. त्याना तरुण नेटसेवी तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मुव्हिंग आउट या वेबसिरीजच्या यशानंतर दिग्दर्शक मयुरेश जोशी एक नवी कोरी वेब सिरीज आपल्या भेटीला घेऊन आला आहे जीच नाव आहे 'यु टर्न'..

'काहे दिया परदेस' या मालिकेतील गौरीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव आणि 'लक्ष्मी सदैव मंगलम', 'खुलता कळी खुलेना' या मालिकामुळे लोकप्रिय झालेला चेहरा ओमप्रकाश शिंदे हे दोघे 'यु टर्न' या वेबसिरीजमध्ये पहिल्यादा एकत्र काम करताना दिसणार आहेत.

नवरा बायकोच्या नात्याभोवती या वेब सिरीजची गोष्ट फिरते. हे नातं जितकं गोड ते टिकवणं तेवढंच अवघड आहे. एकमेकांना सांभाळत पुढे जाताना वारंवार भांड्याला भांड लागतच पण त्यातही ते करता येणं अशक्य वाटू लागतं आणि मग सुरू होते त्या नात्यापासून यु टर्न घेण्याची धडपड यातून नेमकं पुढे काय घडत जात ते या वेब सिरीजद्वारे आपल्याला पहायला मिळणार आहे.

या वेबसिरीजमध्ये एक मोठी सुंदर गजल ऐकायला मिळणार असून ती स्वतः या सिरीजचा दिग्दर्शक मयुरेश जोशी यानेच संगीतबद्ध करून गायलीही आहे. वेबसिरीजच्या सहा एपिसोड द्वारे थोडी थोडी अशी आपल्याला ती ऐकायला मिळेल.

'राजश्री मराठी'च्या 'यु ट्यूब चॅनल'वरही सिरीज एव्हाना सुरू झाली असून प्रत्येक मंगळवारी एक यानुसार तिचे 2 एपिसोड एव्हाना रिलीज झालेत. आता हे एपिसोड प्रेक्षकांना किती आवडतात ते लवकरच कळेलच पण सायली आणि ओमप्रकाश याना एकमेकांसोबत काम करून कस वाटलं आहे ते त्यांच्याकडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांने..

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.