ETV Bharat / sitara

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आता प्रसारित होणार सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर! - 'इंडियाज गॉट टॅलेंट' चा नवा सिझन

'इंडियाज गॉट टॅलेंट' हा शो “गॉट टॅलेंट” या आंतरराष्ट्रीय फॉरमॅटचे भारतीय रूप आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या कार्यक्रमाचे गेले ८ सिझन कलर्स वाहिनीवरून प्रसारित होत होते. आता या प्रसिद्ध शोचा ९वा सिझन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे.

'India's Got Talent'
‘इंडियाज गॉट टॅलेंट’
author img

By

Published : Jun 10, 2021, 7:34 PM IST

एखादा शो अथवा कार्यक्रम प्रेक्षकप्रिय झाला की त्याचे पुढील सीझन्स येत राहतात. शोचे निर्माते प्रत्येक कार्यक्रम सफल होईल आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यन्त पोहोचेल यासाठी झटत असतात. त्यामुळे बऱ्याच चॅनेल्सची अदलाबदली होते. हा एक असा फॉरमॅट आहे, जो विशुद्ध प्रतिभा यशस्वीरित्या प्रेक्षकांपुढे घेऊन येतो, असे स्वरूप जे पुन्हा पुन्हा हे दाखवून देते की वय ही निव्वळ एक संख्या आहे, एक असा फॉरमॅट ज्यामध्ये तुमचा सामाजिक दर्जा, तुम्ही स्त्री आहात की पुरुष वगैरे कसलाच बाध न ठेवता तुमच्या सोलो किंवा समूह परफॉर्मन्सचे स्वागत होते. इंडियाज गॉट टॅलेंट नावाने हे स्वरूप प्रचलित आहे, जे “गॉट टॅलेंट” या आंतरराष्ट्रीय फॉरमॅटचे भारतीय रूप आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या कार्यक्रमाचे गेले ८ सिझन कलर्स वाहिनीवरून प्रसारित होत होते. आता या प्रसिद्ध शोचा ९वा सिझन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे.

२००६ मध्ये अमेरिकाज गॉट टॅलेंटचे प्रसारण झाले, त्यानंतर ७० पेक्षा जास्त देशांमध्ये हा फॉरमॅट यशस्वीरित्या वापरण्यात आला. या फॉरमॅटमध्ये प्रतिष्ठित परीक्षकांची पॅनल देशभरातील होतकरू स्पर्धकांमधून काही स्पर्धक निवडते आणि मग अंतिम विजेता निवडण्याची जबाबदारी मात्र प्रेक्षकांकडे असते. हा फॉरमॅट अनेक प्रतिभावंतांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी मंच पुरवतो आणि तेथून जागतिक संधींचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करतो.‘आयजीटी’ या भारतीय रुपाचे जनक आहेत, सायको आणि फ्रेमॅन्टल. आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने त्याचे अधिग्रहण केले गेले आहे.

फ्रेमॅन्टल, इंडियाच्या एमडी. आराधना भोला, यांनी सांगितले की, “जागतिक टेलिव्हिजन इतिहासात सर्वाधिक यशस्वी रियालिटी फॉरमॅट म्हणून ‘गॉट टॅलेंट’च्या नावे विक्रम नोंदलेला आहे. इंडियाज गॉट टॅलेंट या आमच्या आणखी एका यशस्वी फॉरमॅटसाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनशी हातमिळवणी करताना फ्रेममॅन्टलला आनंद होत आहे. याच्या फॉरमॅटमध्येच अंतर्भूत असलेले वैविध्य आणि समावेशकता यामुळे हा शो भारतातील लोकांच्या प्रतिभेचे यथार्थ सादरीकरण करतो. आम्हाला प्रामाणिकपणे असे वाटते की, याचे आगामी सत्र देखील वर्षानुवर्षे आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणार्‍या आमच्या प्रेक्षकांना अमर्याद मनोरंजन देत राहील.”

आशीष गोळवलकर, हेड- कंटेन्ट, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन अँड डिजिटल बिझनेस, म्हणाले, “एक फॉरमॅट म्हणून इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये भरपूर क्षमता आहे. कथा बाह्य, प्रतिभा-प्रेरित रियालिटी फॉरमॅट प्रांतात हातखंडा असलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनला प्रेक्षकांच्या अभिरुचीस अनुकूल कार्यक्रम सादर करण्याची आणखी एक संधी या फॉरमॅट द्वारे मिळाली आहे. देशातील उत्कृष्ट प्रतिभा सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

कथा बाह्य आणि प्रतिभा-आधारित रियालिटी शोजच्या बाबतीत ब्रॉडकास्ट लीडर म्हणून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचे स्थान अढळ आहे. फ्रेमॅन्टलकडून अधिकार मिळवून आता इंडियाज गॉट टॅलेंटचा नवीन सीझन सादर होणार आहे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.
हेही वाचा - प्रतीक बब्बरची बॉलिवूडमध्ये १३ वर्षे, म्हणाला, 'रोलरकोस्टर राइड' सारखा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.