ETV Bharat / sitara

आरोग्य आणि पोषण आहार माझी प्राथमिकता आहे - मानुषी छिल्लर - पोषणा आहाराबद्दल मानुषी करणार जनजागृती

माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिने पोषण विषयावर सोशल मीडिया मोहीम सुरू केली आहे. याद्वारे तिला लोकांना योग्य अन्नाचे महत्त्व सांगावेसे वाटते. संतुलीत आणि पोषण आहाराबद्दल ती सोशल मीडियावरुन जागृती करणार आहे.

Manushi chiller
मानुषी छिल्लर
author img

By

Published : Sep 1, 2020, 2:08 PM IST

मुंबई - माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मानुषी छिल्लर हिने पोषण विषयावर सोशल मीडिया मोहीम सुरू केली आहे. याद्वारे तिला लोकांना योग्य अन्नाचे महत्त्व सांगावेसे वाटते. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय पौष्टिक सप्ताहाबद्दल मानुषी म्हणाली, "मला वारंवार सांगितले गेले आहे की, आपण जे काही आहोत ते आपण खात असलेल्या अन्नानुरुप आहोत, म्हणून त्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे."

ती पुढे म्हणाली, "योग्य अन्न आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून योग्य पौष्टिकतेने जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा घेता येणाऱ्या सकारात्मकतेबद्दल माहिती व्हावी ही माझी इच्छा आहे."

ती नेहमीच तंदुरुस्ती आणि पौष्टिकतेबद्दल खूप उत्साही असल्याचे मानुषी सांगते.

हेही वाचा - बेयर ग्रील्सने अक्षय कुमारला पाजला हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला चहा

ती म्हणाली, "अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्याबद्दल मी खूपच उत्कट आहे आणि आरोग्य आणि पोषण या यादीमध्ये सर्वात वर आहे. मी आपल्या जेवणात कसा आहार घेते आणि संतुलन ठेवते, की ज्यामुळे मला वारंवार भूक लागणार नाही आणि मी आरोग्याचीही काळजी घेऊ शकेन. सोशल मीडिया जागरूकता मोहिम खूप मजेदार असेल आणि मला आशा आहे की याद्वारे मी अधिकाधिक माझ्यासारख्या विचार करणार्‍या लोकांशी जोडले जाईन. "

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.