वॉशिंग्टन - सोफी टर्नर आणि नवरा जो जोनास यांनी नुकतेच त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले आहे. वृत्तानुसार, जोनासच्या प्रतिनिधीने सोमवारी पीपल्स मॅगझिनला दिलेल्या निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला. "सोफी टर्नर आणि जो जोनास आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा करताना आनंदित आहेत," असे लिहिले आहे.
गेम ऑफ थ्रोन्स स्टार सोफी टर्नर आणि जो जोनास यांना मुलगी झाली असून तिचे नाव त्यांनी विल्ला असे ठेवले आहे. २२ जुलै रोजी लॉस एंजेलिस-एरियामधील रुग्णालयात मुलीचा जन्म झाल्याची बातमी त्यांनीच चाहत्यांना दिली आहे.
फ्रान्समध्ये २०१७ ला एन्गेजमेंट केलेल्या जो आणि सोफी यांनी गेल्या उन्हाळ्यात शाही विवाह केला होता.
''माझा आनंद वाढला आहे. मी ज्याच्या प्रेमात पडले त्याच्यासोबत हे घडले आहे. तो स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करतो आणि मी सुखी होताना पाहतो. मी कोण आहे याचा शोध घ्यायला त्याने मला मदत केली आणि अभिनयाशिवाय इतर गोष्टींमधूनही आनंद शोधायला भाग पाडले,'' असे ती म्हणाली.
जोनास कुटुंबातील ही पहिली मुलगी नाही. जोच्या मोठ्या भावाला केव्हिनला पत्नी डॅनियलसह दोन मुली आहेत - 3 वर्षाची व्हॅलेंटीना अँजेलिना आणि 6 वर्षाची अॅलेना रोज. जो याचा लहान भाऊ निक आणि प्रियंकाला अद्याप मुल झालेले नाही. मात्र घर विकत घेणे आणि मुल होणे हा त्यांच्या आगामी नियोजनाचा भाग आहे.