लॉकडाऊन मुळे घरीच कैद्यांसारखे जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये सेलिब्रिटीजचाही समावेश होता. या काळात अनेकांनी लग्नाची ‘गुड न्यूज’ दिली तर काहींनी ‘गुड न्यूज’. अशीच एक ‘गुड न्यूज’ देतेय राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र. तिने “कुणी तरी येणार, येणार गं” म्हणत/गात बाळ-आगमनासाठी तयार असल्याची बातमी दिली आहे. तिच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे.
![Sawani Ravindra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-savniee-ravindraa-expecting-first-child-mhc10001_29052021202620_2905f_1622300180_600.jpeg)
सावनी लवकरच आई होणार असल्याची बातमी तिने दिलीय. नुकताच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सुमधूर गळ्याची गायिका ‘सावनी रवींद्र’ने नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तिने पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत हे कळवले.
![Sawani Ravindra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-savniee-ravindraa-expecting-first-child-mhc10001_29052021202620_2905f_1622300180_116.jpeg)
सावनीने या गोड बातमी विषयी भावना व्यक्त करताना सांगितले की, “माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणा-या बाळाने मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक आहे.’’
![Sawani Ravindra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-savniee-ravindraa-expecting-first-child-mhc10001_29052021202620_2905f_1622300180_385.jpeg)
पुढे ती सांगते, ‘’आजवर मी गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. अंगाईगीत, डोहाळ जेवणाचे गीत, बारश्याची गाणी मी या आधी गायली होती. पण आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणारं आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला अस वाटतं की प्रत्येक स्त्री ही भाग्यवान असते. कारण ती आई होऊ शकते. आईपण काय असतं हे फक्त एक आईच जाणू शकते आणि सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे. या फेजचा मी पुरेपुरं आनंद घेत आहे. माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.’’
![Sawani Ravindra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-savniee-ravindraa-expecting-first-child-mhc10001_29052021202620_2905f_1622300180_924.jpeg)
हेही वाचा - वसुंधराप्रेमी सोनाक्षी सिन्हाला सोनी बीबीसी अर्थकडून मिळाला ‘अर्थ चॅम्पियन' सन्मान!